होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

New Rules From September: १ सप्टेंबरपासून बदलणार हे ५ नियम; तुमच्या खिशावर त्याचा किती परिमाण होतो ‘ते’ जाणून घ्या

On: August 30, 2026 4:05 PM
Follow Us:
---Advertisement---

New Rules September 2026: नवीन महिना सुरू होणार आहे. आता १ सप्टेंबरपासून अनेक बदल होत आहेत. या बदलांचा संबंध थेट तुमच्या खिशाशी आहे. आता परदेशी प्रवाशांपासून ते एलपीजी गॅस सिलिंडर वापरणाऱ्यांपर्यंत सर्वांसाठी नवीन बदल आहेत. व्यवसाय आणि व्यावसायिकांसाठी आयटीआर (ITR) दाखल करण्याच्या अंतिम मुदत कधी ते जाणून घेणे गरजेचे आहे. अन्यथा नवीन महिना सुरू होण्यापूर्वी हे नियम तपासले नाही तर खिशावर आर्थिक भार पडणार आहे. तसेच काही नियमांमुळे तुम्हाला दिलासा ही मिळणार आहे. त्यामुळे नियमावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे.

ऑगस्ट महिना संपत आला आहे आणि सप्टेंबरच्या सुरुवातीबरोबरच अनेक महत्त्वाचे बदल लागू होणार आहेत. हे बदल खर्चापासून ते बचतीपर्यंत प्रत्येकाच्या जीवनावर परिणाम करू शकतात. बँकिंग, गॅस सिलिंडर, कर, क्रेडिट कार्ड, प्रवास आणि इतर महत्त्वाच्या नियमांमधील बदलांचा तुमच्या खिशावर थेट परिणाम होऊ शकतो. अनेक बदलांमुळे जास्त पैसे भरावे लागू शकतात, तर काही बदलांमुळे दिलासा मिळू शकतो. सप्टेंबरमध्ये लागू होणाऱ्या सर्व प्रमुख बदलांवर लक्ष ठेवा.

प्रवासासा संबंधित बदल

१ सप्टेंबरपासून, भारतातून परदेशात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना इमिग्रेशन काउंटरवर त्यांच्या बोर्डिंग पासवर शिक्का मारण्याची गरज भासणार नाही. प्रवासी आता त्यांच्या मोबाईल फोनवरील इलेक्ट्रॉनिक बोर्डिंग पास किंवा छापील प्रत दाखवून इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण करू शकणार आहे. अधिकाऱ्यांकडून बोर्डिंग पासवर कोणतेही शिक्के मारले जाणार नाहीत. इमिग्रेशन ब्युरोने प्रक्रिया सोपी आणि जलद करण्यासाठी हा बदल केला आहे. यामुळे प्रवाशांचे अनावश्यक काम कमी होईल आणि अस्पष्ट दिसणाऱ्या शिक्क्यांचा त्रास दूर होईल. हा नियम भारताबाहेर प्रवास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना लागू होईल.

आयकर नियम

दरम्यान तुम्ही, व्यवसाय किंवा पेशातून उत्पन्न मिळवत असाल, तर तुमचा आयटीआर (ITR) भरताना योग्य फॉर्म निवडणे गरजेचे आहे. वर्ष २०२६-२७ साठी, ज्यांच्या खात्यांचे ऑडिट करणे आवश्यक नाही, त्यांनी ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत आपले रिटर्न दाखल करणे आवश्यक आहे. आयटीआर- ४, किंवा सुगम फॉर्म, हा अनुमानित कर योजनेअंतर्गत रिटर्न दाखल करणाऱ्यांसाठी आहे आणि त्यांचे व्यावसायिक उत्पन्न ५० लाखांपर्यंत आहे. आयटीआर- ३ हा अशा लोकांसाठी आहे जे आयटीआर- ४ च्या कक्षेत येत नाहीत, जसे की ज्यांचे उत्पन्न ५० लाखांपेक्षा जास्त आहे, ज्यांची खाती पूर्ण आहेत, किंवा जे एफ अँड ओ (फ्युचर्स आणि ऑप्शन्स) ट्रेडिंगमध्ये गुंतलेले आहेत.

एफडी संबंधित नियम

बँका एफडी संबंधित काही नियम बदलणार आहेत. नवीन नियमांनुसार, बँकांना प्रत्येक कामकाजाच्या दिवशी सकाळी १०:१० पर्यंत त्यांच्या वेबसाइटवर ३ कोटी किंवा त्याहून अधिकच्या मोठ्या ठेवींवरील व्याजदर जाहीर करणे आवश्यक असेल. बँकेच्या वेगवेगळ्या शाखा एकाच दिवशी जमा केलेल्या एकाच रकमेवर वेगवेगळे व्याजदर देऊ शकणार नाहीत. तथापि, बँका मोठ्या ठेवींसाठी वेगवेगळे व्याजदर निश्चित करू शकतात. या बदलांचा सर्वसामान्य लोकांच्या लहान एफडींवर फारसा परिणाम होणार नाही. नवीन नियमांचा उद्देश व्याजदरांमध्ये पारदर्शकता वाढवणे आणि बँकिंग प्रणाली अधिक स्पष्ट करणे हा आहे. तथापि, हे बदल १ ऑक्टोबर २०२६ पासून लागू होतील.

एलपीजी सिलेंडर बुकिंगमधील बदल

ज्या घरांमध्ये स्वयंपाकाचा गॅस आहे, त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. जे ग्राहक २३ ऑगस्टपर्यंत त्यांच्या एलपीजी कनेक्शनसाठी ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करू शकले नाहीत, त्यांची ई-केवायसीची अंतिम मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. याचा अर्थ असा की, १ सप्टेंबरपासून ई-केवायसीची सुविधा उपलब्ध राहणार नाही. हे ई-केवायसी किंवा आधार बायोमेट्रिक पुष्टीकरण आवश्यक आहे; अन्यथा, सिलेंडर घरगुती दरात उपलब्ध होणार नाहीत. इंडियन ऑइल, एचपीसीएल (HPCL) आणि बीपीसीएल (BPCL) यांनी लोकांना ही प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्यास आधीच सांगितले आहे. उर्वरित ग्राहकांना नवीन तारखेची माहिती देणारा संदेश मिळेल. गॅस पुरवठ्यात व्यत्यय टाळण्यासाठी वेळेवर प्रक्रिया पूर्ण केल्याची खात्री करा.

हे ही बदल लागू होतील

तसेच, सप्टेंबरमध्ये एलपीजी सिलेंडरच्या किमती बदलू शकतात. बँक एफडी (FD) व्याजदरातही बदल होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमच्या बचतीवर आणि परताव्यावर परिणाम होऊ शकतो. एटीएफच्या दरातही बदल होऊ शकतो. याशिवाय, एटीएम शुल्कातही बदल होण्याची शक्यता आहे. या सर्व बदलांचा सर्वसामान्य लोकांच्या खिशावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होऊ शकतो, त्यामुळे सप्टेंबरच्या सुरुवातीला त्यांच्या नवीन दरांवर आणि नियमांवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरेल.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या; सोन्याची चमक पडली फिकी, वायदे बाजारभाव १.५ लाखांवर पोहोचले

जळगावच्या ‘डी प्लस’ औद्योगिक धोरणाचा प्रस्ताव तातडीने मंजुरीसाठी सादर करा: उद्योगमंत्री डॉ. सामंत यांचे निर्देश

मोठी बातमी: येत्या काही दिवसांत साखरेच्या किरकोळ किंमती कमी होण्याची शक्यता, उद्योग संघटना ‘आयएसएमए’चे मत

सॅमसंगच्या ग्राहकांसाठी खुशखबर: गॅलेक्सी एस २६ एफई (Galaxy S26 FE) ऑगस्टच्या शेवटच्या आठोवड्यात होणार लॉन्च

गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! GMP मध्ये 30 रुपयांचा प्रीमियम; जाणून घ्या डिटेल्स

आयफोन १८ ‘प्रो मॅक्स’ची लॉन्च तारीख जाहीर; असे असतील त्याचे फीचर्स; त्याबाबत अधिक माहिती जाणून घ्या

Leave a Comment