होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

सावधान: जळगावसह ‘या’ ११ जिल्ह्यांना उद्या मुसळधार पावसाचा येलो अलर्ट

On: September 2, 2026 2:29 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: गेल्या अनेक दिवसांपासून जळगावकर दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. मंगळवारी जळगाव जिल्ह्यातील भडगाव, दहीगाव येथे पावसाने हजेरी लावली आहे. उर्वरित जळगावमध्ये पावसाने उघडीप दिली आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस ३ व ४ सप्टेंबर रोजी जळगावला मुसळधार पावसाचा येलो दिला आहे. येथे काही ठिकाणी विजांचा कडकडाट, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा (ताशी ३०-४० किमी) यांसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. जळगावमध्ये पावसाने दडी मारल्याने जिल्ह्या अद्याप दमदार पावसाची आवश्यकता आहे.

३ सप्टेंबरला २ जिल्ह्यांना ऑरेंज तर ११ जिल्ह्यांना येलो अलर्ट

दरम्यान गडचिरोली आणि गोंदिया या दोन जिल्ह्यांना हवामान खात्याने मुसळधार व अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. गुरुवारी ३ सप्टेंबर रोजी जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती,भंडारा बुलढाणा, चंद्रपूर नागपूर, वर्धा, वाशीम यवतमाळ या अकरा जिल्ह्याना हवामान विभागाने मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे.

दरम्यान पुढील दोन दिवस ३ व ४ सप्टेंबर रोजी हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट, मराठवाडा, विदर्भात येलो अलर्ट दिला आहे. मध्य महाराष्ट्रात व विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ होण्याची शक्यता आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

Leave a Comment