New Delhi: भारतीय शेअर बाजार घसरण थांबण्याचे नाव नाही, गुरुवारी सलग चौथ्या दिवशी ही शेअर बाजार घसरला आहे, सेन्सेक्स ४१७ अंकांनी घसरून बंद झाला. तसेच निफ्टी देखील २३,९०० च्या महत्त्वाच्या पातळीखाली घसरला. सकाळच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी ०.४५ टक्क्यांनी वाढले. आदल्या दिवशीच्या घसरणीच्या तुलनेत ही एक किंचित सुधारणा होती. मात्र, व्यवहार संपेपर्यंत बाजार नकारात्मक पातळीवर घसरला. बजाज ऑटो आणि टेक महिंद्राच्या शेअर्समध्ये २ टक्क्यांची मोठी घसरण झाली.
औषधनिर्माण, माहिती तंत्रज्ञान, एफएमसीजी आणि ऑटो क्षेत्रातील शेअर्स दबावाखाली राहिले. रिअल्टी, सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि रसायन क्षेत्रात जोरदार वाढ दिसून आली. खाजगी बँका आणि वित्तीय सेवा क्षेत्रातही पॉझिटिव्हिटी कायम राहिली.वायू , तेल आणि सिमेंट तसेच आरोग्यसेवा क्षेत्रात किंचित वाढ झाली.

जागतिक बाजाराचा कल वेगळा?
दरम्यान ३ सप्टेंबर गुरुवारी जागतिक बाजारात सकारात्मक कल दिसून आला. लंडन वेळेनुसार सकाळी १०:०८ वाजता, स्टॉक्स युरोप ६०० मध्ये ०.३ टक्क्यांची वाढ झाली. एस अँड पी ५०० फ्युचर्समध्ये ०.१ टक्क्यांची वाढ झाली. नॅस्डॅक १०० फ्युचर्समध्येही ०.१ टक्क्यांची वाढ झाली. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल ॲव्हरेज फ्युचर्समध्ये ०.२ टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसून आले.
निर्देशांकांमध्ये वाढ झाली?
एमएससीआय आशिया पॅसिफिक इंडेक्समध्ये ०.७ टक्क्यांची मोठी वाढ झाली. एमएससीआय इमर्जिंग मार्केट्स इंडेक्सदेखील ०.२ टक्क्यांनी वाढून बंद झाला. सकारात्मक जागतिक संकेत असूनही, भारतीय बाजारात घसरण झाली. हे देशांतर्गत घटक आणि गुंतवणूकदारांकडून होणाऱ्या नफावसुलीचे (प्रॉफिट-बुकिंग) उदाहरण आहे, असे एका वृत्त संस्थने म्हटले आहे.











