होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Pachora News: ग्रामसभेत प्रश्न विचारणे जिव्हारी लागले! माजी सरपंचाकडून तरुणाला मारहाण

On: October 3, 2026 1:21 PM
Follow Us:
---Advertisement---

Pachora News: ग्रामसभा ही जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असते. मात्र, जनतेच्या या व्यासपिठाला काळीमा फसल्याची संतापजनक घटना पाचोरा तालुक्यातून समोर आली आहे. तालुक्यातील जारगाव येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत प्रश्न विचारणाऱ्या एका तरुणाला माजी सरपंचाने मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात दोषीवर अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

याबाबात माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे ग्रामपंचायतीतर्फे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डास प्रतिबंधक धूर फवारणी यंत्राच्या विषयावरून चर्चा सुरू असताना एका तरुणाने प्रशासकीय कामांविषयी थेट जाब विचारला. यावरून माजी सरपंच आणि त्या तरुणादरम्यान जोरदार शाब्दिक वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर संतापलेल्या माजी सरपंचाने भरसभेत त्या तरुणाला मारहाण केल्याचा गंभीर आरोप आहे.

मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

तरुणाला मारहाण केल्याचा हा व्हिडिओ उपस्थितांनी मोबाईलमध्ये चित्रित केला असून, तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. या मारहाणीनंतर संबंधित तरुणाने पाचोरा पोलीस ठाणे गाठून सुनील पाटील यांच्याविरुद्ध रीतसर तक्रार दिली. दरम्यान, या प्रकरणावर बोलताना माजी सरपंच सुनील पाटील यांनी वैयक्तिक वादाचा संदर्भ देत, संबंधित तरुणाच्या घरातील सांडपाणी सातत्याने माझ्या प्लॉटमध्ये सोडले जाते, ज्यामुळे मला मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे, असे म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment