होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

सावधान! जळगावात उन्हाचा कडाका वाढणार; पुढील ५ दिवस कमाल तापमान ‘असे’ असेल

On: October 21, 2026 12:57 PM
Follow Us:
---Advertisement---

Latest Weather News: मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे, कोकण गोव्यात व विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ तर मराठवाड्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. जळगावमध्ये उद्या अंशतः ढगाळ आकाश राहील तसेच एक-दोन वेळा पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मात्र, त्यांनतर २२ ते २६ ऑक्टोबर दरम्यान पुढील पाच दिवस आकाश निरभ्र राहणार आहे. तापमानाचा पारा काही दिवसात वाढणार आहे. कमाल तापमान ३६ वरून ३८ अंश सेल्सियसवर जाईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील काही दिवस उकाडा नागरिकांना हैराण करणार आहे.

उकाडा जळगावकरांची परीक्षा बघणार

एकंदरीत पुढील काही दिवस उकाडा जळगावकरांची परीक्षा बघणारा ठरणार आहे. आताच तापमानाचा पाऱ्याने कमाल ३६ अंश सेल्सियस गाठल्याने वातावरणात दिवसभर उन्हाचे चटके जाणवतात. आणि दुपारी तर, प्रचंड उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहे. ऑक्टोबर महिनाअखेर उन्हाचा कडाका आणखी वाढणार असल्यानं नागरिकांना काळजी घावी लागणार आहे. दुपारी बाहेर पडतांना डोके आणि तोंडाला रुमाल गुंडाळावा किंवा डोक्यावर छत्री धरावी जेणे करून शरीराचे उन्हापासून संरक्षण होईल. अधून-मधून ऊन आणि ढगाळ हवामानाची प्रचिती येईल, कारण किमान तापमान देखील १८ अंश सेल्सियसच्या आसपासच आहे.

जळगावचे आठवडाभराचे संभाव्य तापमान

                          किमान        कमाल

  • २१-ऑक्टोबर १८.०      ३६.० अंशतः ढगाळ आकाश, सोबत एक-दोन वेळा पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
  • २२-ऑक्टोबर १८.०     ३६.०        मुख्यतः निरभ्र आकाश/ कोणताही इशारा नाही ० ०
  • २३-ऑक्टोबर १८.०     ३६.०        मुख्यतः निरभ्र आकाश/ कोणताही इशारा नाही ० ०
  • २४-ऑक्टोबर १७.०     ३७.०        मुख्यतः निरभ्र आकाश/ कोणताही इशारा नाही ० ०
  • २५-ऑक्टोबर १७.०     ३७.०        मुख्यतः निरभ्र आकाश/ कोणताही इशारा नाही ० ०
  • २६-ऑक्टोबर १८.०     ३८.०

 

२२ व २३ ऑक्टोबरला कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी पावसाची शक्यता; मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता. तसेच २४ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र आणि गोवा राज्यांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment