होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Jalgaon-Jalna Railway Update : उड्डाणपूल उभारणार, जाणून घ्या कुठे?

On: January 20, 2026 8:05 AM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon-Jalna Railway Update : जळगाव-जालना रेल्वे मार्गासंदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे. अर्थात हा प्रकल्प अंमलबजावणीच्या निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, भूसंपादनाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे.

अंदाजे ७,१०६ कोटी रुपयांचा खर्च


या प्रकल्पासाठी अंदाजे ७,१०६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. विशेषतः पाचोरा–जामनेर–बोदवड रेल्वेमार्गाला छेदणाऱ्या या मार्गासाठी भव्य उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे.

प्राथमिक कामे सुरु

गेल्या काही दिवसांपासून प्रत्यक्ष रेल्वे रूळ टाकण्यापूर्वी आवश्यक असलेली सर्व प्राथमिक कामे सुरू करण्यात आली असून, विविध टप्प्यांवर काम वेगाने सुरू असल्याचे चित्र आहे.

प्रवासी व मालवाहतुकीला चालना मिळणार

हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यानंतर जळगाव-जालना जिल्ह्यास थेट रेल्वे जोडणी मिळू शकणार असून, प्रवासी व मालवाहतुकीला मोठी चालना मिळणार आहे. तसेच औद्योगिक, व्यापारी आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी हा प्रकल्प उपयुक्त ठरणार आहे.

उड्डाणपूल कुठे उभारला जाणार?

हा उड्डाणपूल नवीन पहुर रेल्वे स्थानकापासून सुमारे १.२ किलोमीटर अंतरावर उभारण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment