Chanchal Bhoumik News : बांगलादेशात हिंदूंचा नरसंहार सुरूच आहेत. अशात आणखी चंचल चंद्र भौमिक (वय २३) या हिंदू तरुणाला जाळून मारण्यात आल्याची घटना घडली असून, या घटनेमुळे बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण झाली आहे.
वृत्तानुसार, मृत चंचल हा नरसिंगडी येथे एका गॅरेजमध्ये काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. रात्री उशिरा तो गॅरेजमध्ये झोपलेला असताना काही हल्लेखोरांनी दुकानाच्या शटरवर बाहेरून पेट्रोल ओतले आणि आग लावली. आग आत वेगाने पसरल्याने चंचलचा होरपळून मृत्यू झाला.
घटनेचा सोशल मीडियावर व्हायरल
या घटनेचा सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, घटनेच्या व्हिडिओमध्ये दुकानाबाहेर एक माणूस आग लावताना दिसत आहे, त्यानंतर काही क्षणातच आग गॅरेजमध्ये पसरली.
हिंदू समाजात संताप
घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यात आले असून, सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले., दरम्यान स्थानिक हिंदू समुदायाच्या नेत्यांनी या क्रूर हत्येचा तीव्र निषेध करत गुन्हेगारांची त्वरित ओळख पटवून त्यांना अटक करण्याची मागणी केली. त्यांनी परिसरातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी पावले उचलण्याचे आवाहनही प्रशासनाला केले.









