होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Gold and Silver Rates : अर्थसंकल्पापूर्वीच दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात लक्षणीय घट

On: January 31, 2026 12:09 PM
Follow Us:
---Advertisement---

Gold and Silver Rates : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे दोन्ही धातूंनी ऐतिहासिक पातळी गाठली होती. मात्र, मागील दोन दिवसात या वाढीला ब्रेक लागला असून, दरात लक्षणीय घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात सुमारे २० हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल एक लाख रुपयांची घट झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जळगावच्या सराफ बाजारात दोन दिवसांपूर्वी २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा तब्बल १ लाख ८० हजार रुपयांवर पोहोचला होता. मात्र, अवघ्या दोन दिवसांतच सोन्याच्या दरात २० हजार रुपयांची घसरण होऊन आज दर १ लाख ६० हजार रुपयांवर आलं आहे.

चांदीच्या दरातही अभूतपूर्व घसरण

चांदीच्या दरातही अभूतपूर्व घसरण पाहायला मिळाली आहे. काही दिवसांपूर्वी चार लाख रुपयांच्या ऐतिहासिक पातळीवर पोहोचलेली चांदी अवघ्या दोन दिवसांत थेट एक लाख रुपयांनी घसरली आहे.

इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली घसरण पहिल्यांदाच पाहायला मिळत असल्याने सुवर्ण व्यवसायिकांसह गुंतवणूकदारही संभ्रमात सापडले आहेत.

दरम्यान, उद्या देशात अर्थसंकल्प सादर होणार असून, त्याआधीच मोठी घट झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.  आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार, डॉलरच्या मूल्यामधील बदल आणि गुंतवणूकदारांनी केलेली नफा वसुली यामुळे दरात ही घसरण झाल्याची सांगण्यात येत आहे. दर कमी झाल्याने लग्नसराई आणि गुंतवणुकीच्या दृष्टीने ग्राहकांमध्ये खरेदीसाठी उत्सुकता वाढण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment