होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Pankaja Munde : हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, पुढील प्रवास लांबला!

On: February 3, 2026 12:37 PM
Follow Us:
---Advertisement---

Pankaja Munde : जिल्हा परिषदेसह पंचायत समिती निवडणूक तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. अशात प्रचारासाठी लातूर दौऱ्यावर निघालेल्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये उड्डाण घेण्यापूर्वीच तांत्रिक बिघाड झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, काही वेळात पंकजा मुंडे दुसऱ्या हेलिकॉप्टरने लातूरकडे रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी मंत्री पंकजा मुंडेंच्या आज मंगळवारी (दि. 3 फेब्रुवारी) लातूरसह सोलापुरला सोलापुरातील मंद्रूप, कुंभारी अशा दोन ठिकाणी संध्याकाळी 6 आणि 8 वाजता सभा होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्री पंकजा मुंडे लातूर दौऱ्यावर निघाल्या होत्या, मात्र त्यापूर्वीच हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने पुढील प्रवास लांबला आहे.

दुसऱ्या हेलिकॉप्टरने लातूरकडे होणार रवाना

काही वेळात पंकजा मुंडे दुसऱ्या हेलिकॉप्टरने लातूरकडे रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे.  दरम्यान, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूने अवघ्या महाराष्ट्रासह देशात खळबळ उडाली आहे. अशात मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या वृत्ताने पुन्हा खळबळ उडाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment