होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Mukhyamantri Vayoshri Yojana : ज्येष्ठांच्या सुवर्णकाळाला आधार देणारी योजना, काय आहे पात्रता?

On: February 3, 2026 5:42 PM
Follow Us:
---Advertisement---

Mukhyamantri Vayoshri Yojana : राज्य सरकारने ज्येष्ठांचे जीवन सुखकर करण्यासाठी ”मुख्यमंत्री वयोश्री योजना” सुरु केली आहे. या योजनेंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांना ३००० रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. मात्र, आजही ग्रामीण भागातील अनेक ज्येष्ठ नागरिक या योजनेपासून वंचित असल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर आज आपण यासाठी लागणारी कागदपत्रे, पात्रता आणि कुठे अर्ज करायचा? या सर्व गोष्टी जाणून घेऊया.

काय आहे पात्रता

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार मूळचा महाराष्ट्राचा असणे आवश्यक आहे. वय किमान ६५ वर्षे वा त्यापेक्षा अधिक असावे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २ लाख रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे. तसेच अर्जदारास शारीरिक वा मानसिक त्रास होत असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे बंधनकारक आहे.

लागणारी कागदपत्रे, कुठे अर्ज करायचा?

अर्जासाठी आधार कार्ड, ओळखपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, स्वतःची घोषणा, समस्येचे प्रमाणपत्र, बँक पासबुक, मोबाईल नंबर व पासपोर्ट साईट फोटो आदी कागतपत्रे आवश्यक आहेत. सर्व कागदपत्रांसह समाजकल्याण विभागाकडे अर्ज सादर करावा लागणो.

आर्थिक मदत अन् उपकरणे

या योजनेंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांना ३००० रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. त्याचबरोबर त्यांच्या गरजेनुसार चष्मा, श्रवणयंत्र, फोल्डिंग वॉकर, ट्रायपॉड, व्हीलचेअर, कमोड खुर्ची, गुडघा ब्रेस, ग्रीवा कॉलर, कमरेसंबंधीचा पट्टा आदी आवश्यक उपकरणे पुरवली जातात.

 

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment