Job opportunities : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक -मुंबई विभागीय केंद्र, आदर्श शैक्षणिक समूह, नवीन पनवेल पदवीधर प्रकोष्ट, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र राज्य व युवाशक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 8 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 दरम्यान दादासाहेब धनराज विसपुते सभागृह, आदर्श शैक्षणिक संकुल, देवद-विचुंबे, पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवे लगत, नवीन पनवेल, जिल्हा रायगड येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
काय आहे पात्रता
सर्व शाखेतील आजी व माजी पदविका, पदवीधारक विद्यार्थी व विद्यार्थिनींनीसाठी ही संधी आहे. वय मर्यादा -18 ते 35 असून, विद्यार्थी व विद्यार्थिनींनी या भव्य रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावे, असे आवाहन धनराज विसपुते, प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पार्टी पदवीधर प्रकोष्ट यांनी केले आहे.
2500 पेक्षा अधिक रिक्त पदांसाठी भरती
महाराष्ट्रातील 20 पेक्षा अधिक नामांकित आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये 2500 पेक्षा अधिक रिक्त पदांवर भरती होणार आहे. जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षित बेरोजगार युवकांनी या रोजगार मेळाव्यात भाग घेण्याचे आवाहन आमदार सुरेश भोळे, जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी व जिल्हा महानगर पदवीधर प्रकोष्ठ अध्यक्ष शिरीष तायडे यांनी केले आहे.
(आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिकसह विविध क्षेत्रातील बातमी प्रसिद्धीसाठी “डिजिटल शौर्य मराठी”च्या 7030385085 या क्रमांकवर पाठवावी.)












