होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

वरणगाव येथे ‘रेवा कुटी’त संगीतमय सामूहिक हनुमान चालीसा पठण उत्साहात

On: February 15, 2026 3:44 PM
Follow Us:
---Advertisement---

वरणगाव, ता. भुसावळ : अध्यात्म आणि विज्ञान यांचा सुंदर संगम असलेल्या ‘रेवा कुटी’ या धार्मिक केंद्रात वार्षिक संगीतमय सामूहिक हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. ऊँ सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठानतर्फे आयोजित या उपक्रमात मोठ्या संख्येने हनुमान भक्त सहभागी झाले होते.

प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, नेत्रतज्ञ डॉ. नितु पाटील हे विज्ञान शाखेचे विद्यार्थी असून त्यांनी अत्यंत कठीण अशी नर्मदा माता परिक्रमा पायी पूर्ण करून अध्यात्म क्षेत्रातही आपली निष्ठा सिद्ध केली आहे. त्यामुळे वरणगाव येथील ‘रेवा कुटी’ हे विज्ञान आणि अध्यात्म यांचा दुहेरी सोनेरी संगम असलेले केंद्र ठरले आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, वासुदेव परिवारातर्फे दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी सकाळी ७ ते ९ या वेळेत संगीतमय सामूहिक हनुमान चालीसा पठणाचा उपक्रम राबविला जातो. हिंदू जनजागृतीसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त असून ज्या ज्या ठिकाणी हनुमान मंदिरे आहेत, त्या ठिकाणी अशा प्रकारचे उपक्रम सुरू करणे ही काळाची गरज आहे. आगामी काळात ‘रेवा कुटी’ येथे जागा अपुरी पडेल इतकी भक्तांची गर्दी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमास तपटकाठोरा येथील सरपंच रोहिणी पाटील, प्रशांत पाटील, अतुल झांबरे यांची विशेष उपस्थिती होती. वासुदेव परिवारातील प्रत्येक सदस्याने ११ वेळा संगीतमय सामूहिक हनुमान चालीसा पठण केल्यानंतर आरती, प्रसाद व अल्पोपहाराचा कार्यक्रम पार पडला.

या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी तबलावादक कुणाल शिंदे, दीपक फेंगडे, कमलेश येवले, विवेक पाटील, अनिकेत चव्हाण, उमेश माळी, मनोज गोसावी, लखन शेटे, राम शेटे, राहुल माळी आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन बाळकृष्ण चव्हाण महाराज यांनी केले तर आभार प्रदर्शन कमलेश येवले यांनी मानले.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment