MSRTC: जळगाव जिल्हातील प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, आता जळगाव जिल्ह्यासाठी 178 नवीन बसेस उपलब्ध होणार आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातील या बसेस जळगाव जिल्हाला मिळणार असून शहरातील आणि ग्रामीण भागातील प्रवास अधीक सुकर होणार आहे.
सुरक्षित आणि सोईचा प्रवास म्हणून अनेक जण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळच्या बसेला प्राधान्य देतात. त्यात राज्य शासनाने एसटी बस प्रवाशांसाठी विविध सवलती आणि योजना सुरु केल्या आहे. ज्यामुळे प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता जळगाव एस.टी. विभागाने वाढीव बसची मागणी केली होती. त्यानुसार, या मागणीनुसार या बसेस जिल्ह्यात दाखल होणार आहे.
पूर्वी लक्झरी स्वरुपात 2 बाय 2 बसेस होत्या या बसमध्ये 55 सीट्स होत्या. या बसेसमध्ये आसनांची संख्या कमी होती. परंतु आता 3 बाय 2 बसमुळे आसन मुबलक प्रमाणात असणार असून ग्रामीण आणि निमशहरी भागातील प्रवाशांची उभे राहून प्रवासाची समस्या दूर होणार आहे.
नवीन बस आणल्याने गर्दीची समस्या कमी होईल आणि प्रवाशांना अधिक सोयीस्कर, आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. एकूणच, जळगावकरांसाठी ही नवी व्यवस्था प्रवासाचा अनुभव सुधारेल आणि एसटी प्रशासनाच्या सेवेत अधिक कार्यक्षमतेची हमी देईल. या नवीन बसेस ग्रामीण भागात, शहर ते जिल्हाच्या ठिकाणावर धावणार आहे. मार्च 2026 मध्ये या बसेस जळगाव जिल्ह्याला उपलब्ध होणार असल्याची माहिती ‘शैर्य मराठी’शी बोलताना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे जळगाव विभाग नियंत्रक दिलीप बंजारा यांनी दिली.










