Deputy CM Sunetra Pawar : विधिमंडळ अधिवेशनात राज्याच्या नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यातील महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रात महिला कर्मचाऱ्यांसाठी नवा कायदा आणला जाणार आहे. यासह राज्यातील १८० दिवसांची प्रसूती रजा आणि मेडिकल प्रमाणापत्राशिवाय एक वर्षापर्यंत सुट्टीअशी तरतूद करण्यात येईल अशी माहिती देखील पवार दिली.
काय आहे नवा कायदा
महिला सुरक्षेसाठी शक्ती फौजदारी कायदा विधेयक 2020 सादर करण्यात आले होते.1 जुैल 2024 पासून भारतीय न्यास संहिता लागू झाली. यामुळे राज्य सुधारणा मागे घेण्यात आले. पोलिस महासंचालक यांच्या अध्यक्षेतेखाली समितीच्या शिफारसी नुसार आवश्यक राज्य सुधारणा प्रस्ताव विधी तयार झाला.
त्यावर शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहे. महिला सुरक्षेच्या दृष्टीने महाराष्ट्रता नवा कायदा आणला जात आहे. राज्य शासन आग्रही आहे. मुख्यमंत्र्याकडे मी सातत्याने पाठपुरवठा करत असून लवकर हा कायदा जाहीर होईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली.
180 दिवसांची प्रसूती रजा
केंद्र शासनाच्या धर्तीवर महिलांना त्यात 180 दिवसांची प्रसूती रजा मिळणार असून गरज भासल्यास 1 वर्षांपर्यंत देय अर्ध वेतन रजा कोणत्याही मेडिकल प्रमाणापत्राशिवाय मिळणार आहे. मातृत्व सन्मानासाठी या योजनेची अंमलबजवणी केली जाणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आभार मानत अनेक वरिष्ठ नेत्यांनी आपले मत मांडले











