होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

---Advertisement---

health Tips: उन्हाळ्यात लसणाचे अति सेवन करताय? वेळीच सावध व्हा, अन्यथा उद्भवतील ‘या’ समस्या

On: March 19, 2026 3:37 PM
Follow Us:
---Advertisement---

Garlic In Summers : आपल्याकडे जुन्या जाणत्या लोकांनी आरोग्याच्या अनेक महत्वाच्या टिप्स दिल्या आहेत, विशेषतः घरगुती अनेक उपाय सांगितले आहे, आपली खाद्य संस्कृती वैशिष्ट्यपूर्ण आहे, प्रत्येक घरगुती पदार्थ आणि मसाले यांचे गुणकारी लाभ आहेत तसेच त्याच्या सेवनाने परिमाण ही आहे. आता कोणत्या ऋतूत काय खावे याचे भान राखणार गरजचे आहे. लसूण हा अत्यंत गुणकारी पण कसा आणि कधी खावा हे लक्षात घेणे गरजेचे आहे. आरोग्यासाठी लसण फायदेशीर आहे, सद्या उन्हाळा सुरु असून या दिवसात लसूण खावा के नाही, याचे फायदे तोटे माहिती करून घेऊ या, आजच्या या लेखात.

भारत प्राचीन काळापासून मसाले उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. त्यात घरगुती मसाले आता जगप्रसिद्ध आहेत. आपल्या घरात खाद्य पदार्थ बनवविण्यासाठी त्याचा आवर्जून वापरतो. त्यापैकी असे काही मसाले आहेत जे आपण नियमित वापरतो त्यात लसूण अत्यंत महत्वाचा गुणकारी मसाले पदार्थ आहे. लसणाशिवाय फोडणीची आपण कल्पना करू शकत नाही, भाजी मध्ये टाकण्यासह तो कच्चा सेवन ही केला जातो. लसूण खाल्ल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर होतात. याच्यात आढळणारे पोषक घटक लसूणला अधिक प्रभावशाली बनवतात. लसणाबाबत अनेक गैरसमज आहेत. लोकांच्या मनात अनेक समज गौरसमज आहे. आता उन्हाळा सुरु झाला आहे. उन्हाळ्यात ससून खावा की नाही असा प्रश्न अनेकांना पडला आहे. लसणाचे पुढील प्रमाणे गुणधर्म सांगितले आहे.

असे आहेत, लसणाचा गुणधर्म…कडक उन्हाळा असेल तर लसणाचे सेवन सावधगिरीपुर्वक करावे कारण त्याचा गुणधर्म हा उष्ण आहे , त्यातच सद्या सूर्य आग ओकत आहेत. अशा काळात सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्याच्या सेवनाने उन्हाळ्यात पोटात आग निर्माण होईल, म्हणून गरम गुणधर्म असलेला लसूण विचार करूनच सेवन करावा. पाहिजे. उन्हाळ्यात लसणाचे योग्य प्रमाणात सेवन करावे अन्यथा आरोग्या नुकसान देखील होऊ शकते.

लसणाचे फायदे आणि तोटे

उन्हाळ्यात लसूण खाण्याचे काही फायदे सांगितले आहे, लसूण खाल्याने आरोग्याला काही फायदा ही आहे. त्यातील एक फायदा असा होतो की, लसूण खाल्ल्याने दातदुखी या समस्येपासून आराम मिळतो. लसणात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे घटक असतात नुकसानकारक बॅक्टेरियाला ते प्रतिबंध घालण्यास मदत करतात फक्त त्याचे सेवन काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे.

दुर्गंधी किंवा श्वासा संबंधी काही समस्या असतील त्या दूर करण्यास लसूण फायदेशीर आहे. लसूण खाण्याचे अनेक फायदे , हृदय आणि पोटासाठी ते चांगले असल्याचे सांगितले जाते. आजीचा बटवा ही तेच सांगतो की, योग्य प्रमाणात लसूण सेवन करणे लाभदायी ठरते.लसणाच्या सेवनाने शरीराला डिटॉक्स करता येते. यामुळे अपचनाची समस्या देखील दूर होते. उन्हळ्यात लसूण खाण्याने त्याचे तोटे ही आहेत.

( डिस्क्लेमर : सदरचा लेख हा उपलब्ध स्रोतनुसार आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment