होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

---Advertisement---

सख्खा भाऊ पक्का वैरी: मोठया भावाने व्यसनाधीन लहान भावास केले ठार!

On: March 23, 2026 6:30 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon news: तालुक्यातील नारोद येथील सख्ख्या भावाने व्यसनाधीन भावाला गुळ नदीवरील के.टी.बंधाऱ्यावरून ढकलून गळा दाबून डोक्यात दगड मारून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली. आई वडील व परिवारातील सदस्यांना दारूच्या नशेत तर्र होऊन वारंवार त्रास देण्याच्या प्रकाराला कंटाळून मोठ्या भावाने छोट्या भावाचा दुर्दैवी घात केला आहे. या घटनेने गावभर प्रचंड खळबळ उडाली असून अडावद ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की, नारद येथील रहिवासी रोहन पानाचंद पाटील (वय 23वर्षे) हा घरात रोजच दारू पिऊन, गांजा ओढून नशेत धूत्त होत परिवारात धिंगाणा घालून मानसिक त्रास देत होता.तसेच जुगार खेळण्यासाठी पैसे दिले नाहीत तर आरडाओरडा करून भाऊ सुनील व त्यांच्या पत्नीच्या अंगावर धावून जात होता. या जाचाला कंटाळून मोठा भाऊ सुनील याने मनात राग धरून तो नशेत असतांना संधी साधत रोहन यास गुळ नदी पात्रात केटी बंधाऱ्यात ढकलून खाली पाडल्यानंतर गळा दाबून डोक्यात दगड मारून ठार केले.

दरम्यान नदीपात्रात युवकाचा मृतदेह आढळून आल्याने बघ्यांनी पोलीस पाटील विजय पाटील यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी पोलिसांना कळविले असता, पोलिसांनी घाता-पाताच्या संशयावरून तपास सुरू केला असता सुनीलच्या चेहऱ्यावरील काटेरी झुडपे यांचे व्रण आढळून आल्याने त्यास पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

याप्रकरणी पोलिसात मृताची आई राधाबाई पानानंद पाटील (वय 50 वर्षे )यांच्या तक्रारीवरून अडावद पोलिसात सीसीटीएनएस गुरनं 60/2026 भारतीय न्याय संहिता कलम 103( 1) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.घटनास्थळी एसडीपीओ अण्णासाहेब घोलप यांनी भेट दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ हे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

Railway Division Of Bhusaval: भुसावळ विभागाने या सेक्शनवरील वेगमर्यादा हटविली; वेगवान रेल्वे वाहतुकीला चालना!

जेष्ठ कार्यकर्त्यांच्या बळावर भाजप अवलस्थानी- आ. सुरेश भोळे; भाजपचा 46 वा स्थापना दिनानिमित्त ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान

नाशिक धान्य किरकोळ किराणा संघटनेने पटकावला चषक! ‘मासिआ व्यापारी क्रिकेट करंडक २०२६’

लोकसेवेतून जिवंत ठेवली मानवतेची ज्योत! कै. ॲड उज्वला गायकवाड यांना अनोखी श्रद्धांजली!

LPG Shortage: एलपीजी वितरण ‘डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड’ प्रमाणेच होणार! या प्रणालीचा वापर 90% पर्यंत वाढला..

घरपट्टी- पाणीपट्टी इंडेक्स क्रमांक बंदची अफवा! मनपाने केला सायबर पोलिसात गुन्हा दाखल..

Leave a Comment