होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

जळगाव जिल्ह्यात रामनवमी उत्साहात; राम मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी

On: March 26, 2026 5:11 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: श्रीराम की जय अशा गजरात आज श्री राम नवमी सर्वत्र साजरी करण्यात आली. जळगाव शहरासह जिल्ह्यातील विविध राम मंदिरांमध्ये आज पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली. प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी मंदिरांचे दरवाजे सकाळी लवकर खुले करण्यात आले होते. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर मंदिरांना आकर्षक रोषणाई करण्यात आली असून फुलांच्या सजावटीने मंदिर परिसर उजळून निघाला होता. पहाटे काकड आरतीने धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. त्यानंतर प्रभू रामरायांचा दुग्ध महाअभिषेक करण्यात आला. तसेच ठिकठिकाणी प्रसाद वाटप आणि दानधर्म करण्यात आला. यामुळे सर्वत्र धार्मिक वातावरण निर्माण झाले होते.

दुपारी बारा वाजता राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कथा वाचन करत दादा महाराज जोशी यांनी प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाला जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे तसेच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते प्रभू रामरायांची आरती करण्यात आली.यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. “जय श्रीराम” च्या जयघोषाने संपूर्ण जळगाव शहर दुमदुमून गेले असून, रामभक्तांच्या उत्साहाला विशेष उधाण आलेले पाहायला मिळाले

शहरातही सकाळपासूनच राम मंदिरांमध्ये गर्दी झाली. दया, त्याग आणि सयंमाचे प्रतीक असलेले श्रीराम यांच्या दर्शनाने भक्तांच्या चेहऱ्यावर आज समाधान आनंद पाहायला मिळाला, यावेळी सर्वच मंदिरामध्ये जय श्री रामाच्या गजराने शहर परिसर दुमदुमून गेला होता. त्यामुळे मिरवणूक, कथा वाचन, पूजा आदी धार्मिक कार्यकमानी सर्वत्र धार्मिक वातावरण निर्माण झाले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment