होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

इराण होर्मुझ समुद्रधुनीतून रियाल चलनात टोल वसुलणार? होर्मुझ आणि लेबनान हल्ल्यामुळे तिढा कायम..

On: April 11, 2026 1:10 PM
Follow Us:
---Advertisement---

America-Israel Vs Iran Conflict: इराणच्या पार्लमेंट नॅशनल सिक्युरिटी कमिशन सांगितले की इराण पार्लमेंट मध्ये होर्मुझ सामुद्रधुनी येथून जाणाऱ्या जहाजांकडून टोल हा इराणी चलनात वसूल करावा असा प्रस्ताव देण्यात आला आहे. तो रियाल मध्ये घेण्याचा विचार असल्याचे इराणचे मुंबईतील राजदूत कार्यालयाने यांनी एक्स या सोशल फ्लॅटफॉर्म पोस्ट करून माहिती दिली आहे. असे अल जजिराने वृत्त दिले आहे. अमेरिकेने इराणाला होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यास सांगितले आहे तर इराणने लेबनानवरील हल्ले पहिले थांबवावे अशी मागणी केली आहे. हा तिढा कायम असल्याने दोन्ही बाजू आपल्या मुद्यांवर ठाम असल्याने तिढा कायम आहे.

इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक तत्काळ सुरळीत करावी आणि इराणचे अण्वस्त्र ठेवता येणार नाही, यावर चर्चा सुरू आहे. असे डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. इस्रायलने लेबनान वर भीषण हवाई हल्ले केले आहे. त्यात 300 लोक आतापर्यंत ठार झाल्याचे वृत्त आहे. तर मोठया प्रमाणात मालमत्तेची हानी झाली आहे. लेबनान सोबत शांती वार्ता करण्याचे संकेत पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी दिले होते, त्यानंतर इस्रायलने दक्षिण लेबनानच्या एक सरकारी इमारतीवर हवाई हल्ला केला आहे, त्यात लेबनिज स्टेट सिक्युरिटी एजन्सीचे 13 जण ठार झाले आहे, पहिले लेबनांनवरील हल्ले थांबवा मग चर्चा करू असे लेबनिज सरकारने स्पष्ट केले आहे.

दरम्यान लेबनान हल्ल्यामुळे इराण आणि अमेरिकेत तणाव निर्माण झाला आहे. होर्मूझ सामुद्रधुनी खुली करणे आणि लेबनानवर इस्रायल करीत असलेले हल्ले थांबवावे या मुद्यांसह इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी अमेरिका आणी इराण यांच्यात इस्लामाबाद येथे उपराष्ट्रपती जेडी वॅन्स आणि इराणचे परराष्ट्रीय मंत्री अब्बास अरागची त्यांच्यात चर्चा सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment