America Israel- Iran War: होर्मूझ सामुद्रधुनी वरून अमेरिका आणि इराण यांच्यात तणाव कायम आहे, तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराण यांच्यात शांतीवार्ता पुन्हा सुरू होण्याची चिन्हे दिसत आहे. गुरुवारी चर्चेची दुसरी फेरी सुरू होणार आहे, असे अमेरिकेच्या अधिकाऱ्याचा हवाला देत असोसिएटेड प्रेसने वृत्त दिले आहे. त्यामुळे दुसऱ्या फेरीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून आहे. तसेच पाकिस्तानने देखील शांतीवार्तच्या दुसऱ्या फेरीसाठी मध्यस्थेला तयार असलयाचे सांगून इस्लामाबाद येथे दुसरी बैठक होणार असल्याचे संकेत दिले आहे. यामुळे होर्मूझचा तिढा सुटेल अशी अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. (America Israel- Iran War)
अमेरिका आणि इराण मधील शांतीवार्ता फिसकटल्यावर राष्ट्रपती ट्रम्प यांनी होर्मूझ सामुद्रधुनी वाहतुकीसाठी बंद करण्याचे आदेश दिले होते. राष्ट्रपतीच्या आदेशानंतर अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने होर्मुझ सामुद्रधुनी मधील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पर्शियन आणि ओमान गल्फ येथील बंदरांची अमेरिकेने नाकाबंदी केली आहे. त्यातून इराणचा व्यापार ठप्प करण्याचा अमेरिकेचा इरादा दिसून येत आहे. इराणने याआधीच या मार्गाचा चोक पॉईंट बंद केला, आता अमेरिकेने या मार्गाची वाहतूक रोखला आहे. मार्ग बंद करण्याच्या प्रयत्न केल्यास अमेरिकेसाठी घातक निर्णय ठरेल, असा इशारा इराणच्या (IRGC) लष्कराने दिल्याचे वृत्त इराणची निम-सरकारी वृत्तसंस्था तस्नीम न्यूजने दिले होते. या सागरी मार्गावरील वाहतूक बंद झाल्यास तेल आणि व्यापारावर परिणाम होऊन ऊर्जा संकट वाढणार आहे. त्यामुळे आशियासह जगभर चिंता व्यक्त करण्यात आली. एकूणच सर्व जगासमोर ऊर्जा संकट निर्माण होईल. परिणामी महागाई वाढणार आहे, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. (America Israel- Iran War)
युरेनियम संवर्धनास अमेरिकेचा विरोध
अमेरिका आणि इराण यांच्यातील पहिल्या फेरीच्या 21 तासांच्या चर्चेनंतर ही करार होऊ शकला नाही, मात्र इराणला अण्वस्त्र ठेवता येणार नाही, असे जेडी वॅन्स यांनी स्पष्ट केले होते. कोणत्या अटी मान्य करण्यास इराण तयार नाही, त्यांनी पहिल्या चर्चे दरम्यान सांगण्यास नकार दिला होता. दरम्यान अमेरिकेने इराणकडे 20 वर्ष इराणने युरेनियमचे साठवणूक बंद करण्याचा प्रस्ताव ठेवला होता, मात्र इराणने असहमती दर्शवून 5 वर्ष युरेनियम संवर्धन स्थगित करू असे सांगितले होते. असे वृत्त न्यूयॉर्क टाईम्सने दिले आहे. गुरुवारी चर्चेची दुसरी फेरी सुरू होणार आहे. अमेरिकेच्या अधिकाऱ्याचा हवाला देत असोसिएटेड प्रेसने हे वृत्त दिले आहे. याच दरम्यान अमेरिकेने इराणला चहूबाजूने घेरण्याची रणनीती आखली आहे, त्यामुळे दोन्ही देशात तणाव कायम असून गल्फ परिसरात इराणला उकसवण्याचे काम अमेरिकेने थांबावावे अन्यथा येथील प्रदेश आणि जगाला ते परवडणारे नाही, असा इशारा विदेश मंत्री अब्बास अरागची यांनी स्टेट टिव्हीशी बोलतांना दिला.









