Posh Act Awareness: टीसीएस लैंगिक शोषण प्रकरण राज्यभर गाजत आहे. कामाच्या ठिकाणी महिलांचे मानसिक आणि शारीरिक अत्याचार हा (PoSH) कायद्याने गुन्हा आहे. कामाचे ठिकाण मग ते शासकिय असो की खाजगी, कधी मैत्री तर कधी कामाचे आमिष दाखवून महिलांचे लैंगिक शोषण केले जाते. पॉश (The Prevention of Sexual Harassment Act,) लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्याने लैंगिक छळाच्या घटनांना चाप लावता येतो, मात्र या कायद्याविषयी पीडित लोकांना फारसे माहिती नसते, किंवा अशी प्रकरणे दाबली जातात, अशा घटना घडल्यावर नेमके काय करावे, कुठे तक्रार करावी हे सूचत नाही, पिडीतांसमोर अनेक प्रश्न उपस्थित होतात, परंतु पॉश कायद्याविषयीची माहिती जाणून घेतल्यावर अशा घटनांना प्रतिबंध घालता येतो.
विशाखा मार्गदर्शक तत्वे म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने कामाच्या ठिकाणी होणारे लैगिक शोषण रोखण्यासाठी घालून दिलेली मार्गदर्शक तत्वे होय, लैंगिक शोषणाविरुद्धचा हा कायदा काय म्हणतो, त्याला कसा प्रतिबंध घायलाचा? याची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. शासनाचा महिला आणि बाल कल्याण विभाग कार्यशाळा घेऊन याबाबत सातत्याने जनजागृती करत असतो.
कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाची माहिती
लैंगिक छळ म्हणजे काय?
*खालीलपैकी कोणतीही एक किंवा अधिक अनिष्ट कृत्ये किंवा वर्तन (थेट किंवा सूचित) :-
*शारीरिक स्पर्श आणि जवळीक साधण्याचा प्रयत्न करणे.
*लैंगिक सुखाची मागणी किंवा विनंती करणे.
*लैंगिक स्वरुपाची शेरेबाजी करणे.
*अश्लील साहित्य (चित्रे, व्हिडिओ) दाखवणे.
*लैंगिक स्वरुपाचे इतर कोणतेही अनिष्ट शारीरिक, शाब्दिक किंवा अशाब्दिक वर्तन.
*नोकरीमध्ये सवलतींचे स्पष्ट किंवा गर्भित आश्वासन देणे,
*नोकरीमध्ये त्रास देण्याची किंवा कामावरून काढून टाकण्याची धमकी देणे.
*कामाच्या ठिकाणी भीतीदायक किंवा प्रतिकूल वातावरण निर्माण करणे.
*तिच्या आरोग्यावर किंवा सुरक्षिततेवर परिणाम होईल असे अपमानजनक वर्तन करणे.
*कामाचे ठिकाण (Workplace) म्हणजे काय ?
*कोणताही विभाग, संस्था, उपक्रम, कार्यालय, शाखा किंवा युनिट जे सरकार किंवा खाजगी संस्थांद्वारे
*स्थापित, मालकीचे किंवा नियंत्रित आहे.
*सर्व खाजगी क्षेत्रातील संस्था, संस्था, सोसायटी, ट्रस्ट, एनजीओ (NGO), व्यावसायिक, शैक्षणिक, मनोरंजन, औद्योगिक किंवा आरोग्य सेवा केंद्रे इत्यादी.
*रुग्णालये किंवा नर्सिंग होम्स.
*क्रीडा संस्था, स्टेडियम, क्रीडा संकुले किंवा स्पर्धेची ठिकाणे.
*नोकरीच्या दरम्यान कर्मचारी भेट देत असलेले कोणतेही ठिकाण (नियोक्त्याने पुरवलेली वाहतूक व्यवस्था किंवा प्रवासासह),
*एखादे घर किंवा निवासस्थान.
*माहिती उघड केल्यास दंड तक्रार किंवा चौकशीची माहिती उघड करणाऱ्या व्यक्तीकडून ५००० रुपये दंड वसूल करणे,
PoSHकायद्यांतर्गत महत्त्वाच्या गोष्टी :-
१. सुरक्षित कामाच्या ठिकाणी हक्क नियोक्ते सुरक्षित आणि सन्माननीय कामाचे वातावरण देण्यास बांधील आहेत. पीडित महिलेला समितीकडे मदत मागण्याचा अधिकार आहे.
२. तक्रार दाखल करणे लेखी तक्रार घटनेच्या ३ महिन्यांच्या आत दाखल करणे आवश्यक आहे (काही प्रकरणांमध्ये ६ महिन्यांपर्यंत मुदत वाढू शकते). तक्रार लिहिण्यासाठी मदत पुरवली जाऊ शकते.
३. चौकशी प्रक्रिया : समितीने ९० दिवसांच्या आत चौकशी पूर्ण करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वावर आणि गोपनीयतेने पार पाडली जाते.
४. अंतरीम सवलती (Interim Reliefs):- चौकशीदरम्यान, पीडित महिला खालील विनंती करू शकतेः
स्वतःची किंवा आरोपीची बदली.
३ महिन्यांपर्यतची रजा (नियमित रजेव्यतिरिक्त).
५. निष्कर्ष आणि दंड :- छळ सिद्ध झाल्यास, शिस्तभंग कारवाईमध्ये कामावरून काढून टाकणे किंवा इतर कायदेशीर दंडाचा समावेश असू शकतो.
शिक्षा आणि दंड (Penalties)
तक्रार सिद्ध झाल्यास खालीलपैकी कारवाई होऊ शकते :-
लेखी माफी मागणे.
चेतावणी, समज किंवा निंदा करणे.
पदोन्नती (Promotion) किंवा वेतनवाढ (Increment) रोखणे.
नोकरी संपुष्टात आणणे (Termination).
पीडित महिलेला आर्थिक भरपाई देणे.
टीप :- दुर्भावनेने केलेल्या खोट्या तक्रारींसाठी देखील दंड किंवा शिक्षा होऊ शकते.
SHe-Box पोर्टल म्हणजे काय ?
(Sexual Harassmen ElectronicBox)
हे कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी महिलांना एक सुरक्षित, सुलभआणि पारदर्शक मार्ग प्रदान करणारे डिजिटल व्यासपीठ (Platform) आहे.
मुख्य वैशिष्ट्येः
स्थानिक समिती काय आहे ? (Local Committee- LC)
*जिल्हाधिकाऱ्यांकडून (DM/ADM/DC) तक्रारी प्राप्त करण्यासाठी जिल्ह्यामध्ये ‘स्थानिक समिती’
*स्थापन केली जाते, जेव्हा :-
*अंतर्गत समिती (IC) स्थापन केलेली नसेल, किंवा
*कामाच्या ठिकाणी १० पेक्षा कमी कर्मचारी असतील, किंवा
*तक्रार खुद्द नियोक्त्याविरुद्ध (Employer) असेल.
*अंतर्गत समिती (Internal Committee- IC) काय आहे?
*१० किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या प्रत्येक कामाच्या ठिकाणी ‘अंतर्गत समिती’ स्थापन करणे अनिवार्य आहे.
IC च्या मुख्य जबाबदाऱ्या :-
तक्रारी प्राप्त करणेः कर्मचाऱ्यांकडून लैंगिक छळाच्या तक्रारी स्वीकारणे.
तडजोड अहवालः सेटलमेंट झाल्यास त्याचा अहवाल नियोक्त्याला देणे आणि दोन्ही पक्षांना त्याची प्रत देणे.
चौकशी प्रक्रियाः ९० दिवसांच्या आत निष्पक्ष आणि वेळेत चौकशी पूर्ण करणे.
शिफारसीः चौकशीचे निष्कर्ष आणि शिफारसी योग्य कारवाईसाठी नियोक्त्याकडे सादर करणे.
गोपनीयताः संपूर्ण प्रक्रियेदरम्यान कडक गोपनीयता राखणे.
वार्षिक अहवालः वार्षिक अहवाल तयार करून तो नियोक्ता आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणे.
सुरक्षित वातावरण सुनिश्चित करण्यासाठी नियोक्त्याच्या जबाबदाऱ्या :-
PoSHधोरण तयार करणे कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या विरोधात सर्वसमावेशक धोरण तयार करणे आणि लागू करणे.
IC ची स्थापना :- १० किंवा १० पेक्षा जास्त कर्मचारी असल्यास समिती स्थापन करणे.
वेगवेगळी अंतर्गत समिती कार्यालयाच्या शाखा वेगवेगळ्या ठिकाणी असल्यास, प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र समिती असावी.
जागरूकता कार्यक्रम :- कायद्याबद्दल कर्मचाऱ्यांना शिक्षित करण्यासाठी कार्यशाळा आयोजित करणे.
समितीला प्रशिक्षण: IC सदस्यांची क्षमता वाढवण्यासाठी नियमित प्रशिक्षण देणे.
माहिती प्रदर्शित करणे POSH धोरण आणि समिती सदस्यांची माहिती कामाच्या ठिकाणी ठळकपणे लावणे,
शिफारसींवर कारवाई: चौकशी अहवाल मिळाल्यापासून ६० दिवसांच्या आत शिफारसींवर कारवाई करणे.
(टीप: अधिक माहिती ही राज्य महिला आयोगाच्या संकेतस्थळावर मिळू शकेल)










