होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

खर्च हजारात उत्पन्न शेकड्यात, कांदा उत्पादक शेतकयांची अवस्था बिकट

On: May 19, 2026 1:55 PM
Follow Us:
---Advertisement---

Nashik News: खर्च हजारात आणि उत्पन्न शेकड्यात, अशी परिस्थिती सध्या कांदा उत्पादकांची झाली आहे..त्यामुळं राज्यात ठिकठिकाणी उद्रेक बघायला मिळत आहे. विंचूर चौफुलीवर आमदार रोहित पवार तर संभाजी नगर मध्ये ठाकरे सेनेच्या अंबादास दानवे यांनी आंदोलन करून कांदा उत्पादकांचा आक्रोश सरकार समोर मांडण्याच्या प्रयत्न केला.

नाशिक जिल्ह्यात कांद्याचं मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. मात्र अस्मानी संकटामुळं चांगला भाव मिळेलच याची ग्यारंटी नाही. एक क्विंटल कांदा लागवडीपासून ते तो मार्केटपर्यंत येईपर्यंत जवळपास 75 हजार रुपये खर्च येतो. त्यामुळं किमान दोन हजार रुपये तरी भाव मिळणं अपेक्षित आहे. एवढा भाव मिळाला तर उत्पादन खर्च जाऊन निदान दोन पैसे तरी शेतकऱ्याच्या पदरात पडतील.

सद्या मात्र पाचशे ,साडेपाचशे रुपये भाव मिळत असल्यानं उत्पादकांचा भडका उडाला आहे. खर्च 50 हजार रुपये आला आणि हातात 20 हजार रुपये पडले, अशी व्यथा उत्पादक बोलून दाखवत आहे. भाव घसरण्यामागं अस्मानी संकटाच कारण दिलं जात आहे. गारपीट, अवकाळी पावसात कांदा भिजला आणि त्याचा दर्जा घसरल्याचं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळं मार्केटमध्ये दर मिळत नसल्याचंही सांगण्यात आलं, अजून महिनाभर तरी ही परिस्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जून अखेरीस मात्र हाच कांदा तीन साडे तीन हजारा पर्यंत पोहचू शकतो. तो पर्यंत तरी शेतकऱ्यांचा उद्रेक बघायला मिळणार आहे.

लासलगाव बाजार समितीत कांद्याला सर्वसाधारण सोमवारी ११२५ तर शुक्रवारी ११५० प्रति क्विंटल इतका दार होता. कमाल दर १६०० रूपये प्रति क्विंटल इतका कांद्याला दरा होता. कांद्याचा वाढत खर्च शेततकऱ्यांना आता परवडत नाही, महागाईमुळे महागडी बियाणे घेऊन उत्पादन काढणे जोखमीचे झाले आहे. पुन्हा कांदा दरातील अस्थर्य शेतकऱ्याच्या अडचणीत भर घालणारे आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment