Mlc Election: नाशिक विधान परिषेदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीत अखेर पर्यंत घोळ सुरू होता, अपक्ष गोकुळ गीते यांनी प्रचार केला नाही पण पाठींबा दिला नाही आणि माघार देखील घेतली नाही, मात्र निवडून आले ते गीतेच, महायुतीतून ही मोठे मतदान झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे युतीत मिठाचा खडा पडला आहे. भाजपचे गणेश गीते यांचे बंधू अपक्ष गोकुळ गीते (Gokul Gite) यांनी मघारीच्या नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra Darade)यांचा दारुण पराभव केला आहे. दराडे शेवटॊपर्यंत निवडणुकीचा कल समजून घेण्यात कमी पडले. नेमके मतदारांच्या मनात काय चालले काय? त्याचा थांगपत्ता दराडे यांना लागला नाही, आणि अपक्ष गोकुळ गिते विजयी झाले.
व्हॉट्स ऍप स्टेटसची चर्चा
दरम्यान त्यांनी रविवार फादर्स डे निमित्त ठेवलेले व्हॉट्स ऍप स्टेटस चर्चेत होते, ‘कल तुम्हारे नाम से पिता की पहचान बदल दो’ अशा आशयाचे स्टेट्स ठेवले होते, स्टेटस आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी गोकुळ गिते हे आमदार झाले. दरम्यान नरेंद्र दराडे यांचा मुलगा कुणाल दराडे याने फोन वरून गीते यांचा बाप काढल्याने गोकुळ गिते संतापलेले होते. त्यांनी अधिकृतपणे माघार देण्यास नकार दिला होता. प्रचारात ते उतरले नाही पण पाठींबा ही दिला नाही.

गोकुळ गीते यांच्या पत्नी म्हणाल्या की, “कार्यकर्त्यांनी ही निवडणूक आपल्या खांद्यांवर घेतली होती, आम्ही प्रचारात नव्हतो मात्र दिलेला निष्क्रिय उमेदवार बघता कार्यकर्त्यांनीच प्रचार करून निवडून आणल्याचे सांगितले.” या विजयानंतर गोकुळ गीते हे आपल्या निफाड तालुक्यातील शिंगवे मूळ गावी पोहोचले. तिथे त्यांच्या मातोश्री आणि कुटुंबीयांने त्यांचे औक्षण केले. यावेळी आमदार गोकुळ गीते प्रचंड आक्रमक झाले. “निवडणुकीत माझा बाप काढण्यात आला होता, माझे वडील सात ये आठ वर्षांपासून पॅरेलाईज अंथरूणाला खिळून आहेत. त्यामुळे मी माझा बाप दाखवून दिला,” असे म्हणत दराडेंवर निशाणा साधला आहे.
दराडे म्हणाले, सर्वानी गद्दारी केली
दरम्यान दराडे यांनी आपल्यासोबत स्व पक्षासह महायुतीतील सर्वत्र पक्षांनी गद्दारी केल्याचा आरोप लावला. मात्र थेट कुणाचे नाव घेतलं नाही. हा पराभव दराडे यांना जिव्हारी लागला आहे. भाजपचे नाशिक महापालिकेतील १२२ पैकी ५० टक्के मते गीतेंना पडल्याचे बोलले जात आहे. मतदारांची नाराजी देखील या निवडणुकीत स्पष्ट जाणवली. त्याचा परिमाण दराडे यांच्या पराभवात झाला. मतदारांना ओळखण्यात कमी पडल्याचे सांगण्यात यते आहे. दरम्यान गिरीश महाजन यांनी विश्वासघात केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.











