होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Health Tips : पावसाळ्यात मक्याचे कणीस ठरते आरोग्यासाठी वरदान, असे करा सेवन

On: June 28, 2026 4:02 PM
Follow Us:
---Advertisement---

Benefits Of Eating Corn : सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाच्या या मोसमात खवय्यांना ओढा लागते ती मक्याच्या कणीसाची. पावसाच्या वातावरणात गरमागरम मक्याचे कणीस खाण्याची मज्जा निराळीच. जिभेचे चोचले पूर्ण करणारे मक्याचे कणीस आरोग्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावते. कारण मक्याच्या कणीसमध्ये फायबर, व्हिटॅमिन ए, कॅरोटीनॉइड्स आदी महत्त्वाचे पोषक तत्त्वे असतात. मक्याचे कणीस कसेही खाल्ले तरी त्याचा आरोग्याला फायदाच होतो. आजच्या या लेखात आपण जाणून घेऊया पावसाळ्यात मक्याचे कणीस खाण्याचे आरोग्याला काय फायदे होतात.

 

हे आहेत आरोग्यदायी फायदे

 

पचन संस्था होते मजबूत…

पावसाळ्यात दूषित पाणी व वातावरणामुळे पचनक्रियेसंबंधी अनेक समस्या निर्माण होता. अशात मक्याचे कणीस सेवन केल्याने पचनाशी संबंधित तक्रारी दूर होतात. मक्यामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते, जे आरोग्यला फायदेशीर ठरते. त्यामुळे पावसाळ्यात तुम्हाला पोटदुखी, अपचनाची समस्या, गॅस आदी त्रास होणार नाहीत. खोकल्याची समस्या दूर करण्यासाठी देखील मक्याच्या कणीस लाभदायक ठरते.

 

प्रतिकारशक्ती वाढते

पावसाळ्यात आरोग्यासंदर्भात अनेक किरकोळ समस्या निर्माण होतात. या मोसमात रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्याने लोक आजारांना बळी पडतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीत मक्याच्या कणीसाचे सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मक्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक पेशी मजबूत होतात.

 

त्वचेचा पोत सुधारतो

पावसाळ्यात त्वचेवर पुरळ आणि लालसरपणाची समस्या वाढते. या दरम्यान तुम्ही मक्याचे सेवन केले पाहिजे. मक्याच्या कणीसमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे त्वचेचा पोत सुधारत त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

असा करा आहारात मक्याचा समावेश

 

कॉर्न सँडविच रेसिपी

तुम्ही पावसाळ्यात कॉर्न सँडविचही बनवू शकता. यासाठी होल ग्रेन ब्रेडमध्ये कोथिंबीर चटणी लावा. त्यावर उकडलेले मक्याचे दाणे आणि इतर भाज्या ठेवा. सँडविच बेक करा. व्यवस्थित बेक झाल्यानंतर खा.

 

कॉर्न सूप रेसिपी

पावसाळ्यात तुम्ही कॉर्न सूप घेऊ शकता. कॉर्न सूप बनवण्यासाठी कुकरमध्ये मक्याच्या कणीसाचे दाणे, दोन कप पाणी आणि थोडे मीठ मिसळा. २ ते ३ शिट्ट्या झाल्यावर मक्याचे दाणे वाटून कढईत गरम करा. यात थोडी कोथंबीर आणि काळी मिरी घालून मिक्स करा. त्यानंतर गरमागरम सूपचा आनंद घ्या.

(डिस्क्लेमर : सदरचा लेख हा उपलब्ध स्रोतनुसार आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

Leave a Comment