Reason of Weak Immunity: आपण निरोगी राहावं असं प्रत्येकाला वाटतं. निरोगी राहण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती चांगली असणे गरजेचे आहे. यासाठी लोक व्यायामसह काही उपाय देखील लोक करतात. मात्र, तरी देखील काही लोकांना वारंवार आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवतात. तुम्ही देखील आरोग्याच्या समस्येने त्रस्त होत वारंवार आजारी पडत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही वारंवार आजारी पडत असाल तर लक्षात घ्या तुमची रोग प्रतिकारशक्ती कमकुवत झाली आहे. प्रतिकारशक्तीची कमकुवत होण्यामागे काही करणे आहेत, ती कारणे जाणून घेऊया.
या लेखात आम्ही तुम्हाला अशा कोणत्या सवयी आहेत, ज्यामुळे व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत होऊ शकते. वेळेत या सवयी ओळखल्यास तुम्हाला भविष्यातील आरोग्यविषयक गंभीर धोके टाळता येवू शकतात. चला तर मग जाणून घेऊया अधिक माहिती.
‘या’ सवयी त्वरीत दूर करा
साखरेचे अतिसेवन
साखरेमुळे पदारार्थाचा गोडवा वाढत असला तरी साखरेचे अधिक प्रमाणात सेवन आरोग्याला घातक ठरू शकते. साखरेचे अधिक प्रमाणात सेवन केल्याने अनेक समस्या निर्माण होतात. त्यात मधुमेहाची समस्या सर्वाधिक प्रमाणात जाणवते. ज्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे जास्त प्रमाणात साखरेचे सेवन करणे टाळा.
जंक फूड
हल्ली चायनीजसह इतर जंक फूड खाण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. हे पदार्थ हे जिभेचे चोचले पुरवत असले तरी हे पदार्थ आरोग्यासाठी घातक आहे. या पदार्थांमध्ये पोषक घटक नसतात. त्यामुळे व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते.
रिफाइंड कार्बोहायड्रेट अन्न
व्यक्तीने रिफाइंड कार्बोहायड्रेट असलेले अन्न देखील कमी प्रमाणात खावे. अशा अन्नाचे सेवन केल्याने व्यक्तीची रोग प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते. यासह हल्ली लोकांची जीवनशैली देखील बदलली आहे. लोकं रात्री उशिरापर्यंत मोबाईल बघता यामुळे पुरेशी झोप होत नाही. त्यामुळे देखील रोग प्रतिकार शक्तीवर परिणाम होतो.
तेलकट पदार्थ
तळलेले पदार्थ चविष्ठ वाटत असले तरी ते खाल्ल्याने रोग प्रतिकारशक्तीवर परिणाम होऊ शकतो. अधिक प्रमाणात तेलकट पदार्थ खाल्ल्याने हृदयासंबंधी आजार निर्माण होतो. यासह आरोग्याशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे तेलकट पदार्थांचे सेवन टाळले पहिले.
प्रक्रिया केलेले मांस
रोग प्रतिकारशक्ती कमकुवत करण्यासाठी प्रक्रिया केलेले मांस देखील कारणीभूत ठरते. प्रक्रिया केलेल्या मांसामध्ये सॅच्युरेटेड फॅट आढळते जे आरोग्यासाठी हानिकारक ठरते. त्यामुळे प्रतिक्रिया केले मांस खाणे टाळले पाहिजे.
(डिस्क्लेमर : सदरचा लेख हा उपलब्ध स्रोतनुसार आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)











