होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

दसऱ्याच्या दिवशी किरकोळवादातून एकाची चॉपरने भोसकून हत्या; दोघे संशयित ताब्यात

On: October 21, 2026 3:03 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: जळगावच्या खेडी शिवारातील माउलीनगर परिसरात दसऱ्याच्या रात्री दांडिया खेळणाऱ्या महिलांवर दुचाकीचा हेडलाइट चमकवल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एकावर चॉपरने वार करून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघां संशयिताना ताब्यात घेतलायचे समजते.

घटना अशी

हत्या करण्यात आलेल्या मृत व्यक्तीचे नाव किरण विठ्ठल पाटील असे असून आणखी एक जण जखमी झाले असून किशोर छगन पाटील असे दुसऱ्या व्यक्तीचे नाव आहे. दांडिया खेळणाऱ्या महिलांवर दुचाकीचा हेडलाइट चमकवल्याच्या वादातून घटना घडल्याचे प्राथमिक माहितीसमोर आली आहे. एमआयडीसी पोलिसांनी रोहित पाटील आणि मयूर जाधव या दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दसऱ्यानिमित्त माउली नगर परिसरात दुर्गा मंडळातर्फे गरबा-दांडिया रासचे आयोजन करण्यात आले होते. रात्री उशिरा कार्यक्रम सुरू असताना दुचाकीचा दांडिया खेळणाऱ्या महिलांवर हेडलाइट चमकला. यावरून विचारणा करण्यात आली असता, दोन्ही बाजूंमध्ये वाद निर्माण झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याचे समजते.

चॉपरने सपासप वॉर

दरम्यान वाद सोडवण्याच्या दृष्टीने किरण विठ्ठल पाटील आणि किशोर छगन पाटील यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. परंतु याच दरम्यान एका संशयिताने चॉपर काढून किरण पाटील यांच्या छातीत वार केल्याचे सांगण्यात येते. या हल्ल्यात किरण पाटील यांचा मृत्यू झाला, तर किशोर पाटील हे गंभीर जखमी झाले. या हल्ल्यात मयूर जाधव, रोहित पाटील आणि आणखी एका संशयिताचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून. घटनेनंतर संशयित पसार झाले होते. एमआयडीसी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून संशयित आरोपी रोहित पाटील व मयूर जाधव या दोघांना ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment