Nashik News: नाशिक- त्र्यंबकेश्वर येथील ध्वजारोहण समारंभासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू याना अधिकृत निमंत्रण दिले. ३१ ऑक्टोबर रोजी हा सोहळा होणार असून गोदामातेची आरती ही राष्ट्रपतींसह मांन्यवरांच्या उपस्थितीत होईल. यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांना महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण वारशाचे दर्शन घडवणारी एक भेटवस्तू ही देण्यात आली. यावेळी त्याच्या उपस्थितीत ‘गोदावरी आरती’सह ‘नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण’च्या संकेतस्थळाचे उद्घाटन, कुंभमेळ्याच्या गीताचे प्रकाशन आणि एका ‘कॉफी-टेबल बुक’चे आणि विशेष टपाल तिकिटाचे अनावरण करण्यासाठी ही त्यांना निमंत्रण देण्यात आले आहे.
यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. छगन भुजबळ, शालेय शिक्षण मंत्री ना.दादा भुसे, अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. नरहरी झिरवाळ, नाशिकचे पालकमंत्री तथा कुंभमेळा मंत्री ना. गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आडके-आहेर, त्र्यंबक नगर परिषदेच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार, नाशिक पुरोहित संघाचे चंद्रशेखर पंचाक्षरी, त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे, रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे नरसिंहकृपा दास, त्र्यंबकेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मादाय सहआयुक्त न्या. विवेक सोनुने, सिहंस्थ कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त प्रवीण गेडाम, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह आदी मान्यवरांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती भवनात भेट घेतली.

राष्ट्रपतींना देण्यात आलेल्या या अधिकृत निमंत्रण पत्रिकेमध्ये कुंभमेळ्याची उत्पत्ती आणि त्याचे आध्यात्मिक महत्त्व दर्शवणारी एक कलात्मक परंपरा आणी त्याचे पैलू दिसून येत असून त्यामाध्यमातून मानवी पंचज्ञानेंद्रियांशी संबंधित घटकांचा समावेश करण्यात आला आहे, जे नाशिकचा सांस्कृतिक वारसा, गोदावरी नदी आणि भारतीय परंपरेत या उत्सवाचे असलेले महत्त्व अधोरेखित करणारे आहे.











