होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

चोपडा बस आगाराच्या ताफ्यात नव्या कोऱ्या ११ बसेस दाखल; आ. प्रा चंद्रकांत सोनवणे अन् माजी आ. लताताई सोनवणे यांच्या हस्ते लोकार्पण

On: October 22, 2026 8:02 PM
Follow Us:
---Advertisement---

Chopda News: चोपडा येथील एसटीच्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. चोपडा एसटी आगारामधील बसची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. अनेक दिवसापासून बसची मागणी होती. त्याची दखल घेऊन आमदार प्रा चंद्रकांत अण्णा सोनवणे यांनी राज्यशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून आतापर्यंत ३५ बसेस मंजूर करून आणल्या. त्यातच चोपडा एसटी आगाराच्या ताफ्यात ११ नव्या कोऱ्या राजमाता जिजाऊ बसेस दाखल झाल्या आहेत. अद्यावत व अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण अशा ११ नवीन बसेसचा लोकार्पण सोहळा आज चोपडा आगार येथे आ. प्रा चंद्रकांत सोनवणे माजी आ. लताताई सोनवणे यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला.

दरम्यान या वर्षभरात चोपडा आगारात २० ए.सी.,१० डिझेल, ५ राजमाता जिजाऊ बसेस व आज पुन्हा नवीन ११ राजमाता बसेस अशा एकूण ४६ बसेस दाखल झाल्याने प्रवाशांमध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण आहे.

नव्या बसेसने प्रवाशांचा प्रवास आरामदायी होणार

नुकत्याच राज्य सरकारने ५,००० नवीन बसेसची खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, यातील जास्तीत जास्त बसेस आपल्या विभागात मिळवण्यासाठी आ. चंद्रकांत सोनावणे प्रयत्नशील होते. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्याने आज बसेस आगारात दाखल झाल्यावर त्याचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. परिवहन हा दळणवळणासाठी, विद्यार्थ्यांचे शिक्षण, शेतकरी बांधवांसाठी महत्वाचा घटक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, सुनेत्राताई पवार यांनी राज्यभरातील वयोवृद्ध व्यक्तींना बसचा प्रवास मोफत आणि समस्त महिला भगिनींना बस प्रवासात अर्धे तिकिटाची सूट देऊन पुन्हा एकदा सर्वसामान्यांना राज्य शासनाच्या बस प्रवासाकडे मोठ्या संख्येने वळविण्याचे काम केले आहे.

आज महायुतीची सत्ता असताना परिवहनमंत्री प्रताप सरनाईक पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या माध्यमातून यापुढील काळात अधिकचा निधी आणण्याचा प्रयत्न राहील, असे आश्वासन आ. प्रा चंद्रकांत अण्णा सोनवणे यांनी यावेळी दिले. यावेळी पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील, शहर पोलीस निरीक्षक पवन देसले, उपनगराध्यक्ष पंकज बोरोले, मंगलताई पाटील, शिवराज पाटील, किरण देवराज, प्रताप आण्णा पाटील,प्रकाश रजाळे ,नगरसेवक दिपक पाटील, हनिफ सत्तार,अमोल पाटील, रविंद्र पाटील, सौ.कल्पना पाटील, संचालिका कृ.उ.बा. समिती, नगरसेविका शालिनी पाटील, रुकसारबी बागवान रमाकांत ठाकुर ,सविता पाटील, स्वाती बडगुजर ,शितल देवराज ,माजी नगरसेवक महेंद्र धनगर, ए के गंभीर, मधूकर पाटील आखतवाडे, अशोक बापू पाटील, सुभाष पाटील, रविंद्र पाटील वर्डी, अरुण पाटील, संजय बोरसे, रविंद्र पाटील, चंद्रशेखर साळूंखे, सचिन महाजन, कालू भाऊ, प्रकाश राजपूत, दिपक चौधरी, मनोज पाटील, पुंडलिक महाजन, सुनील पाटील ,प्रदिप बारी, गोपाल चौधरी, अरुण बाविस्कर, नामदेव आप्पा पाटील, मंगल इंगळे, अनु ठाकुर, मुन्ना ठाकूर, शरद पाटील, जितेंद्र कोळी, सुशील पाटील, हर्षल लोहार, किरण गुरव, हरिष सोनार, एस. आर. पाटील, राहुल पाटील लासुर, निवृत्ती पाटील, बापू पाटील, मच्छू पाटील, नंदु गवळी, विकी जाधव, लोकेश पाटील, अकील जहागिरदार, अनुराग चौधरी, फरमान मिस्तरी, संदीप पाटील, किरण चौधरी, रविंद्र पाटील, सुनिल सपकाळे, गणेश पाटील, मंगल पाटील, आगार व्यवस्थापक संदेश क्षिरसागर, चालक, वाहक कार्यशाळा कर्मचारी यांच्यासह आगाराचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार बांधव व नागरिक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment