होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Donovan Ferreira injured : डाव्या खांद्याला दुखापत, दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसण्याची शक्यता!

On: January 19, 2026 10:27 AM
Follow Us:
---Advertisement---

Donovan Ferreira injured : 2026 चा टी20 विश्वचषक 7 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. मात्र, या स्पर्धेपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. अष्टपैलू खेळाडू डोनोवन फरेरा यांच्या खांद्याला दुखापत झाल्याने, त्यांच्या या स्पर्धेत सहभागावर शंका निर्माण झाली आहे.

जोहान्सबर्ग सुपर किंग्ज आणि प्रिटोरिया कॅपिटल्स यांच्यातील सामन्यादरम्यान डोनोवन फरेरा यांना दुखापत झाली. जोहान्सबर्ग सुपर किंग्जकडून खेळणारा फरेरा कव्हर बाउंड्रीवर क्षेत्ररक्षण करत असताना त्याने चेंडू रोखण्यासाठी डायव्ह केला, ज्यामुळे त्याच्या खांद्याला दुखापत झाली.

क्षेत्ररक्षणानंतर, फरेरा फलंदाजीसाठी आला परंतु खांद्याच्या दुखापतीमुळे आणि रिटायर्ड हर्टमुळे तो एकापेक्षा जास्त चेंडू खेळू शकला नाही. ESPNcricinfo नुसार, त्याचा खांदा फ्रॅक्चर झाला आहे. त्यामुळे डोनोवन फरेरा केवळ SA20 मधून बाहेर पडला नाही तर 2026 च्या T20 विश्वचषकातही त्याची संधी धोक्यात आली आहे.

जर डोनोवन फरेरा बाहेर पडला तर त्याची जागा कोण घेईल? असं प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान, रायन रिकेल्टन हा डोनोवनची घेऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. रिकेल्टनला संधी का मिळू शकते?तर रिकी पॉन्टिंग हा SA20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने नऊ डावांमध्ये दोन शतकांसह 337 धावा केल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment