होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी मतदान; नागपूर पदवीधर निवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी बजावला मतदानाचा हक्क

On: October 23, 2026 4:42 PM
Follow Us:
---Advertisement---

MLC Election: विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर रोजी संपत असल्याने या जागांसाठी द्विवार्षिक निवडणुका घेतल्या जात आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर-मराठवाडा, पुणे या पाच मतदारसंघासाठी मतदान होईल. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाआघाडी असा राजकीय सामना रंगला आहे. ५ जागांसाठी निवडणुकीत १८२ उमेदवार आपले नशीब आजमावत आहे. युती आणि आघाडी या दोन्ही गटांना बंडाचा सामना करावा लागला आहे. एकूण १०,६८,०७२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. या निवडणुकीचा निकाल २७ ऑक्टोबर रोजी जाहीर होईल. दरम्यान नागपूर पदवीधर मतदार संघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांसाठी शुक्रवारी सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली. या जागांमध्ये शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांचा समावेश आहे. सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान सुरू राहील. निवडणूक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, एकूण २,४१९ ​​मतदान केंद्रांवर १०,६८,०७२ मतदार मतदान करतील. मतमोजणी २७ ऑक्टोबर रोजी होईल आणि निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल.

दुपारी २ वाजपर्यंतचे मतदान

विधान परिषदेच्या पाच मतदारसंघांमध्ये निवडणुका होत आहेत: तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघ. पुणे विभाग पदवीधर, नागपूर विभाग पदवीधर, पुणे विभाग शिक्षक, छत्रपती संभाजीनगर पदवीधर आणि अमरावती शिक्षक मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. अमरावती शिक्षक मतदार संघात दुपारी २ पर्यंत ६३.९ टक्के मतदान झालं. अकोला- ६४.१४ टक्के, वाशिम- ६४.०६ टक्के, यवतमाळ- ५९.६१ टक्के, बुलडाणा- ६२.२५ टक्के मतदान झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment