होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Horoscope 8 February 2026, राशीभविष्य : मेष ते मीन राशीसाठी कसा राहील रविवार, वाचा राशीभविष्य

On: February 7, 2026 8:02 PM
Follow Us:
---Advertisement---

Horoscope 8 February 2026, राशीभविष्य : पंचांगानुसार, रविवार, 8 फेब्रुवारी 2026 रोजी माघ कृष्ण पक्ष सप्तमी तिथी असून ती पहाटे 5 वाजून 01 मिनिटांपर्यंत राहील. त्यानंतर, अष्टमी तिथी प्रारंभ होईल. या दिवशी गण्ड योग संध्याकाळी 6 वाजून 38 मिनिटांपर्यंत राहील, त्यानंतर वृद्धी योग असेल. सूर्योदय सकाळी 7 वाजून 12 मिनिटांनी तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 33 मिनिटांनी होईल. मुख्यत्वे, हा दिवस स्वाती नक्षत्राच्या प्रभावाखाली आहे. अशात मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी हा दिवस कसा राहील जाणून घेऊया राशीभविष्याच्या माध्यमातून.

मेष राशी – आजचा दिवस तुम्हाला कंटाळवाणं वाटू शकतो. कार्यलयातील जुनं काम किंवा घरातल्या त्याच दैनंदिन दिनचर्यांमुळे तुम्हाला त्रास जाणवेल. पण, आज अचानक  तुमच्या मनात एक नवीन कल्पना येईल, जी तुम्हाला उत्साहाने भरून टाकेल.

वृषभ राशी – आज  तुमचं मन थोडे अस्वस्थ असेल आणि तुम्ही गुंतवलेले पैसे आणि वेळ योग्य आहेत का असा प्रश्न तुम्हाला पडेल. तुम्हाला असे वाटेल की तुमच्या कष्टाचे फळ मिळण्यास खूप वेळ लागत आहे. असे असले तरी आज तुम्हाला एखादा गोड संदेश किंवा छोटी भेट मिळू शकते, ज्यामुळे तुमचा मूड बदलण्यास मदत होईल.

मिथून राशी – आजचा दिवस तुम्हाला संमिश्र फळ देणारा ठरेल. त्यामुळे शांत बसून जवळच्या व्यक्तीशी बोलून कोणत्याही कामासाठी त्यांचा सल्ला घ्या. जुन्या मित्राचा फोन किंवा काही चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे तुमचा ताण कमी होईल.

कर्क राशी – आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा ठरेल.  तुम्हाला असे वाटेल की तुम्ही तुमचे विचार आणि आनंद जगापासून लपवून ठेवावे. तुमचा बॉस किंवा कुटुंबातील सदस्य तुमची प्रशंसा करतील. थोडी विश्रांती घ्या आणि तुमच्या वागण्यात आणि बोलण्यात लवचिकता ठेवा.

सिंह राशी – आजचा दिवस भावनिक ताण निर्माण करणारा ठरेल. भावनांना बळी पडण्याऐवजी, तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला पैसे कमविण्याची किंवा तुमच्या करिअरमध्ये प्रगती करण्याची एक नवीन संधी मिळेल. जुन्या आठवणी सोडून भविष्यावर लक्ष केंद्रित करा.

कन्या राशी – आज, तुम्हाला आयुष्य खूप आरामदायी वाटेल. आज, तुम्हाला काहीतरी वेगळे करण्याची ईच्छा होईल, जसे की नवीन छंद सुरू करणे किंवा सहलीचे नियोजन करणे. आज तुम्हाला मोबाईल फोनशिवाय थोडा वेळ एकटे घालवत स्वतःशी बोला; तुम्हाला तुमच्या समस्यांवर उपाय सापडेल. बाह्य आवाजाऐवजी तुमचा आतील आवाज ऐका; तो तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल.

तूळ राशी- आज घरी किंवा कामावर वाद होऊ शकतात. असे असले तरी तुम्ही यातून मार्ग शोधाल आणि सर्वांना सोबत घ्याल. आज तुमच्या जोडीदाराशी किंवा जवळच्या मित्राशी तुमचे संभाषण खूप चांगले होईल. हे संभाषण सर्व तणाव विसरण्यास मदत करेल. सायंकाळ प्रियजनांसोबत घालवाल.

वृश्चिक राशी- आज अविवाहितांना लग्नाचा प्रस्ताव येईल. आज तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. तुम्हाला जास्त प्रयत्न न करता महत्त्वाचे कागदपत्रे मिळतील. एकंदरीत आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदी ठरेल.

धनु राशी – दिवसाच्या सुरुवातीला तुम्ही एखादी मौल्यवान वस्तू गमावू शकता. शिवाय, भूतकाळातील चुकीमुळे तुम्हाला तुमच्या कुटुंबासमोर लाजिरवाणे वाटू शकते. आर्थिकदृष्या आजचा दिवस संमिश्र राहत खर्चही कमी राहील.

मकर राशी – आजचा दिवस नवीन काम सुरू करण्यासाठी शुभ आहे.  तुम्ही जुन्या मित्राला भेटाल आणि त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवाल. यातुन तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. आज तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे.

कुंभ राशी – आज तुम्हाला आरोग्याची समस्या जाणवेल. तुम्हाला अस्वस्थ आणि आळशी वाटू शकते. तुम्हाला कामातून विश्रांती घ्यावीशी वाटेल. तुम्ही तुमची अपूर्ण कामे हळूहळू पूर्ण कराल. यासह आज तुम्ही असे काहीतरी नवीन आणि धाडसी काम कराल ज्याची कोणीही कल्पना केली नसेल.

मीन राशी – भविष्याच्या दृष्टीने आजचा दिवस सकारात्मक राहील. तुम्ही तुमच्या आयुष्यातील पुढील मोठ्या टप्प्याची योजना आखाल. तुमची एखादी जुनी इच्छा पूर्ण होऊ शकते. ज्यामुळे तुम्ही आनंदी राहाल. सर्वार्थाने आजचा दिवस चांगला राहील.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment