होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Crime News: चोपड्यात सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने घेतला गळफास 

On: February 26, 2026 6:05 PM
Follow Us:
---Advertisement---

Crime News: जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातील लोहिया नगर भागातील 25 वर्षे युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. दरम्यान, मृताच्या खिशात सुसाईड नोट सापडल्याने घटनेचे गुढ वाढले आहे.

 शहरातील लोहिया नगरमधील रहिवासी असलेल्या योगेश सुनील चौधरी (वय 25) या युवकाने सावकाराच्या जाचाला कंटाळून आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. खिश्यात आढळलेल्या सुसाईट नोटवरून सावकाराने पैशांचा तगादा लावल्यामुळे कंटाळून गळफास घेतल्याचे चिठ्ठीत नमुद केले आहे. त्यात पिंटू नामक व्यक्ती पैशांसाठी सतत तगादा लावत असल्याने मी आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे. पिंटू नामक सावकाराकडून मयत योगेशने 10 हजार रुपये घेतले होते. त्या पोटी त्याने दोन लाख रुपये व्याज पिंटूला दिले आहे. तरी तो पैशांसाठी तगादा लावत होता. सावकाराने मृत योगेशला पैशांसाठी धमकी देऊन मारहाण केली होती. तसेच त्याच्या आई-वडिलांनाही शिवीगाळ केली होती. या सर्व गोष्टींना कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख योगेशने चिठ्ठीमध्ये केला आहे.

पिंटू या व्यक्तीला पोलिसांनी कडक शिक्षा करावी, अशी विनंतीही त्याने सुसाईट नोटमध्ये केली आहे. योगेशचे कुटुंब अतिशय हलाखीच्या परिस्थितीत आपला उदरनिर्वाह करीत आहे. मृत योगेश चौधरी याच्या पश्चात आई, वडील, असा परिवार आहे. मृत योगेश हा हातमजुरी करत होता, अशी माहिती परिसरातील मित्र मंडळी व नातेवाईकांनी दिली.

दरम्यान या घटनेची शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. पोनि मधुकर साळवे यांनी मृताच्या खिशात चिठ्ठी आढळून आली असून पैशांचा उल्लेख असल्याच्या वृत्त्तास दुजोरा दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment