होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

वरणगाव स्मशानभूमीजवळ मध्यरात्री महिलेचा संशयास्पद वावर, नागरिक झाले भयभीत

On: March 2, 2026 7:24 PM
Follow Us:
---Advertisement---

Varangaon News:  वरणगावातील विकास कॉलनीजवळ असलेल्या स्मशानभूमीत गेल्या तीन चार दिवसापूर्वी रात्री 11 ते 12 वाजेच्या सुमारास एक महिलेचा संशयास्पद वावर दिसून आला. ही महिला स्मशानभूमीच्या गेटजवळ चिटकून उभी असलेली काही तरुणांना दिसून आली. या महिलेला पाहून तरुणांनी भयभीत होऊन तिथून पळ काढला आणि इतर तरुणांना सोबत घेऊन तिथे परत येऊन त्या महिलेला स्मशानभूमी जवळून हाकलून लावले. दरम्यान, या प्रकारामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर महिला या ठिकाणी का आली? तिचे नेमके या ठिकाणी येण्याचे कारण काय? स्मशान भूमीत जाऊन काही अघोरी प्रकार करणार होती का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने नागरिकांमध्ये चर्चिले जावू लागले आहे.

वरणगाव शहर हे चाळीस ते पन्नास हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावात दोन स्मशान भूमी आहे. एक सिद्धेश्वर नगर येथे तर दुसरी गावात जुनी वर्षानुवर्षे असलेली या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जातात. पूर्वी स्मशानभूमी पत्राची होती. या जागेची खूप अवस्था बिकट झाली होती. मागच्या काही कालखंडात शहरात सहकारमित्र चंद्रकांत हरी बढे सर पंतसंस्थेच्या माध्यमातून या स्मशान भूमीचे बांधकाम करून कायापालट झाला होता. तेव्हापासून रात्रीच्या वेळी या स्मशानभूमीचे लोखंडी गेट लावून घेतले जाते.

 

त्या महिलेला विचारला जाब

 

मागच्या तीन चार दिवसापूर्वी विकास कॉलनीमधील काही तरुण रात्री 12 वाजेच्या सुमारास स्मशानभूमी जवळ लघुशंखेसाठी गेले असता त्या स्मशान भूमीच्या लोखंडी गेटला चिटकून उभी असलेली एक महिला या तरुणांना दिसली. त्या महिलेला पाहताबरोबर तरुण भयभीत झाले आणि दुसऱ्या तरुणांना आणले. आलेल्या तरुणांनी आणि  महिलांनी गेट जवळ चिटकून उभी असलेल्या महिलेला तू कुठली आहे?  तुझे नाव सांग? तू कशा करता या ठिकाणी आली? असे एक न अनेक प्रश्न विचारले असता ती महिला बोलली की मी प्रतिभा नगरची आहे. मग इथे का आली? असे विचारले असता ती काहीच बोलली नाही. मग उपस्थित तरुणांनी त्या महिलेला तिथून पळवून लावले.

 

 ती महिलेबद्दल नागरिकांमध्ये भीती

 

या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांच्या मनात एक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नेमका प्रकार काय आहे. ती महिला वेडसर आहे का मनोरुग्ण? ती कशी काय इतक्या रात्री स्मशान भूमी जवळ आली. ती काही अघोरी कृत्य करणार होती का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने नागरिक आपापसात एकमेकात चर्चा करीत आहे.

(भुसावळ विभागातील बातम्या तसेच जाहिरातींसाठी संतोष माळी- मो. क्रं. 9673151726, 8830123557 यांच्याशी साधावा.)

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

अमळनेरला गुडघा-खांदा आजारांवर तज्ज्ञ उपचारांची सुविधा; येत्या मंगळवारी प्रसिद्ध डॉ. पियुष वसईकर यांची सेवा उपलब्ध

उन्हाळ्यात पाणी आणि वीजपुरवठा अखंडितपणे सुरू ठेवा: पालकमंत्र्यांचे निर्देश! जिल्ह्यात आजपर्यंत एकही ‘टँकर’ सु नाही

संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त नागरिक संघोष्टीचे आयोजन

अमळनेरमध्ये यंदा पहिल्यांदाच ‌‘आखाजी महोत्सव‌’; खान्देशी परंपरेचा जल्लोष, महिलांसाठी स्पर्धांची रेलचेल!

टीसीएस प्रकरणात धर्मांतरासाठी कट्टरतावादी संघटनांकडून आर्थिक बळ?

धक्कादायक! चक्क मंत्र्यांच्या पत्नीने सादर केले खोटे कागदपत्र; भुसावळच्या नगराध्यक्षांचा आरोप, पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

Leave a Comment