Latest Gold and Silver Price Update India: इराण- इस्त्रायल, अमेरिका युद्धाचा फटका संपुर्ण जगाला बसत आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे मौल्यवान धातुंसह गॅसच्या दरातही वाढ झाली आहे. अशात सध्या लग्नसराईचा मौसम सुरु आहे. लग्न म्हटलं सोनं अन् चांदीची खरेदी होतेच. दरम्यान, सुरु असलेल्या युद्धजन्य स्थितीचा थेट फटका सामान्यांच्या खिशाला बसत आहे. घरगुती आणि व्यवसायिक गॅसच्या दरवाढीनंतर आता सोन्यासह चांदीच्या दराने उसळी घेतली आहे. जागतिक तसेच भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या दराने चांगलीच उचांकी गाठली आहे.
मुंबईत आज सोन्याच्या दरात वाढ होत प्रति तोळा सोनं 1 लाख 65 हजार 249 रुपयांनी विकला जात आहे. मुंबईत काल 10 ग्रॅम सोन्याचा दर 1 लाख 64 हजार 355 रुपये इतका होता. कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात 900 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे खरेदीदारांच्या खिशाला कात्री बसली आहे. चांदीच्या दरातही आज वाढ दिसून आली. चांदी प्रति किलो चांदी 2 लाख 81 हजार 14 रुपयांनी सराफाच्या बाजारात विकली जात आहे. सोनं आणि चांदीच्या दरात होणारी वाढ पाहून ग्राहक चिंतेत पडले आहेत.
असे आहे आजचे दर
भारतात आज 24 कॅरेट 1 तोळं सोन्याच्या दरात 700 रुपयांची वाढ झाली आहे. 10 ग्रॅम सोनं खरेदीसाठी आपल्याला 1,62,380 रुपये मोजावे लागतील. 22 कॅरेट 1 तोळं सोन्याच्या दरात 650 रुपयांची वाढ झाली आहे. 10 ग्रॅम सोनं खरेदीसाठी आपल्याला 1,48,850 रुपये मोजावे लागतील. 18 कॅरेट सोन्याच्या दरानेही उच्चांकी गाठली आहे. 18 कॅरेट 1 तोळं सोन्याच्या दरात 530 रुपयांची वाढ झाली आहे. 10 ग्रॅम सोनं खरेदीसाठी आपल्याला 1,21, 790 रुपये मोजावे लागतील.









