होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

---Advertisement---

महिला शक्तीचा जागर! योगक्षेत्रातील ३५ कर्तृत्ववान महिलांना ‘योगिनी पुरस्कार २०२६’ प्रदान

On: March 21, 2026 1:55 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर जळगाव शहरात योग आणि महिला शक्तीचा अभूतपूर्व संगम पाहायला मिळाला. महाराष्ट्र योगशिक्षक संघ, जळगाव जिल्हा समितीयांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘योगिनी पुरस्कार २०२६’ सोहळा नुकताच मु. जे. महाविद्यालयाच्या आनंदयात्री योग हॉलमध्ये अत्यंत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात योगक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३५ महिलांना त्यांच्या योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. चार वर्षांपूर्वी गुढीपाडव्याला संघाची स्थापना झाली होती. त्यानिमिताने संघाच्या चौथ्या वर्धापनदिनी योगिनी पुरस्कार देऊन महिलांचा सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे अध्यक्ष हठयोगिनी चित्रा महाजन यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले. प्रमुख पाहुण्या म्हणून के.सी.ई. सोसायटीच्या शैक्षणिक संचालिका आणि सोलापूर विद्यापीठाच्या माजी कुलगुरू ज्ञानयोगिनी डॉ. मृणालिनी फडणवीस उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या अमृत वचनातून योगसाधनेचे महत्त्व विशद केले. तसेच, प्रमुख अतिथी म्हणून आरोग्यभारती देवगिरी प्रांताच्या उपाध्यक्ष कर्मयोगिनी डॉ. लीना पाटील यांनी महिलांना आरोग्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.मनोज निलपवार आणि राज्य कार्यकारी अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

प्रेरणादायी सन्मानार्थी महिला

आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून समाजाला आरोग्य आणि सकारात्मक जीवनमूल्ये देणाऱ्या ३५ महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यामध्ये चित्रा महाजन, अर्चना गुरव, नूतन जोशी, स्वाती निकम, सोनाली पाटील, पल्लवी उपासनी, सोनल महाजन, शीला रावत, शालिनी देसले, शीतल पाटील, चित्रा आसोदेकर, दीपा कोल्हे, पूजा महाजन, वैशाली दामोदरे, मृदुला कुलकर्णी, हेमांगिनी सोनावणे यांच्यासह जया सपकाळे, संध्या कुलकर्णी, नेहा कारेकर-गुरव, स्नेहा कुळकर्णी, वैशाली भारंबे, डिम्पल रडे, गौरी पाटील, प्रिया दारा, क्रांती गुरव, सीमा पाटील, अर्चना जळगाववाला, ज्योती हरेल, मनीषा कोरके, कविता चौधरी, कविता सोनार, नेहा तळेले, निशिता रंगलानी, स्मिता पिले आणि रुद्राणी देवरे या महिलांनाही सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि अर्चना गुरव यांच्या गुरुवंदनाने झाली. सूत्रसंचालनाची जबाबदारी संस्थापक सदस्य डॉ.कृणाल महाजन यांनी पार पाडली प्रस्तावना योगशिक्षण समितीचे प्रमुख डॉ. देवानंद सोनार यांनी केली, तर आभार प्रदर्शन विभागप्रमुख सुनील गुरव यांनी मानले. या सोहळ्यासाठी पांडुरंग सोनार, नूतन जोशी, सोनाली पाटील, पल्लवी उपासनी, रोहन चौधरी, कैलास पाटील आणि जिल्हा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

Railway Division Of Bhusaval: भुसावळ विभागाने या सेक्शनवरील वेगमर्यादा हटविली; वेगवान रेल्वे वाहतुकीला चालना!

जेष्ठ कार्यकर्त्यांच्या बळावर भाजप अवलस्थानी- आ. सुरेश भोळे; भाजपचा 46 वा स्थापना दिनानिमित्त ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान

नाशिक धान्य किरकोळ किराणा संघटनेने पटकावला चषक! ‘मासिआ व्यापारी क्रिकेट करंडक २०२६’

लोकसेवेतून जिवंत ठेवली मानवतेची ज्योत! कै. ॲड उज्वला गायकवाड यांना अनोखी श्रद्धांजली!

LPG Shortage: एलपीजी वितरण ‘डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड’ प्रमाणेच होणार! या प्रणालीचा वापर 90% पर्यंत वाढला..

घरपट्टी- पाणीपट्टी इंडेक्स क्रमांक बंदची अफवा! मनपाने केला सायबर पोलिसात गुन्हा दाखल..

Leave a Comment