होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

टीसीएस प्रकरणात धर्मांतरासाठी कट्टरतावादी संघटनांकडून आर्थिक बळ?

On: April 17, 2026 3:15 PM
Follow Us:
---Advertisement---

Nashik News: नामांकित टीसीएस कंपनीच्या नाशिक प्रकल्पात संशयित संघटितपणे गट स्थापून कार्यरत होते. लग्नाचे अमिष दाखवून लैंंगिक शोषण, कामाच्या ठिकाणी छळ आणि एका युवकाच्या धर्मांतराचा प्रयत्न आदी प्रकरणी आठ अधिकारी-कर्मचाऱ्यांविरुद्ध एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत. संशयितांच्या कारवायांना धार्मिक कट्टरपंथी गट किंवा संघटनांकडून आर्थिक रसद पुरवली जात होती का, याची छाननी केली जाणार आहे. या अनुषंगाने नाशिक पोलिसांनी इंटेलिजन्स ब्युरो (आयबी), राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए), दहशतवाद विरोधी पथकाशी (एटीएस) पत्रव्यवहार केला आहे.

टीसीएस सारख्या नावाजलेल्या बहुराष्ट्रीय कंपनीत महिलांविषयक असे प्रकार घडल्याने त्याचे गांभीर्य वाढले. कंपनीत कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून 2022 ते 2026 या कालावधीत विनयभंग, लैंगिक आणि मानसिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावणे, धर्मांतर असे प्रकार घडले. लग्नाचे अमिष दाखवून संशयिताने लैंगिक शोषण केल्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून कंपनीतील घटनाक्रमाविषयी माहिती घेण्यास सुरुवात केली. महिला पोलीस अधिकारी आणि अंमलदार साध्या वेशात टीसीएसच्या कार्यालयात पोहोचल्या. महिला कर्मचाऱ्यांना भेटून धीर देणे, त्यांचे समूपदेशन करून मनोबल वाढविले. त्यानंतर कंपनीतील अन्य महिला तक्रारी देण्यासाठी पुढे आल्याचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नमूद केले.

या संदर्भात दाखल गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत दानिश शेख (31,रा. भाभानगर), तौफिख अत्तार (34, सात्विकनगर, अशोका मार्ग), शाहरूख हुसैन कुरैशी (34, अशोक मार्ग), रझा रफिक मेमन (35, मुरादशाह दर्ग्यासमोर), असिफ अन्सारी, शफी शेख आणि अश्विनी चैनानी (51, लुलानगर, पुणे) यांना अटक केली आहे. संशयितांची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली. यातील संशयित निदा खान मात्र अजूनही फरार आहे असून पोलिसांच्या हाती लागलेली नाही. संशयितांनी गट स्थापून संघटीतपणे कंपनीत पीडितांना त्रास देणे, त्यांच्या धार्मिक भावना दुखावणे, विनयभंग आदी प्रकार केले. पीडितेवरील अत्याचार प्रकरणी दाखल पहिल्या गुन्ह्यात संशयित पीडितेला रिसॉर्टवर घेऊन गेला होता. तेथील पुरावेही तपास यंत्रणेने ताब्यात घेतले आहेत. ऑनलाईन पैसे दिल्याचे पुरावेही जप्त करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त कर्णिक यांनी सांगितले.

संशयितांनी धर्म परिवर्तनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी एक गुन्हा आहे. संशयितांच्या गटाकडून चाललेल्या कृत्यांसाठी त्यांना बाहेरील कट्टरपंथी गट वा संघटनांचा पाठिंबा होता का, याची छाननी विशेष तपास पथक (एसआयटी) करीत आहे. संशयितांना यासाठी निधी मिळत होता का, आंतरराष्ट्रीय पातळीवरून काही आर्थिक मदत मिळत होती का, या दृष्टीने तपास केला जात आहे. या संपूर्ण घटनाक्रमांबाबत इंटेलिजन्स ब्युरो (आयबी), दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) या यंत्रणांशी पत्रव्यवहार करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त कर्णिक यांनी म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त नागरिक संघोष्टीचे आयोजन

अमळनेरमध्ये यंदा पहिल्यांदाच ‌‘आखाजी महोत्सव‌’; खान्देशी परंपरेचा जल्लोष, महिलांसाठी स्पर्धांची रेलचेल!

धक्कादायक! चक्क मंत्र्यांच्या पत्नीने सादर केले खोटे कागदपत्र; भुसावळच्या नगराध्यक्षांचा आरोप, पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

अमळनेर तालुक्यात भूजलपातळी घटली! पाडळसरे परिसरातील तापी, बोरी, पांझरा पट्ट्यात केळी, पपईला बसला फटका

स्वीकृत नगरसेवकपदी 7 जणांची बिनविरोध निवड; मनपा महासभेत शिक्कामोर्तब

खूशखूबर! पाचोरा, जामनेर, बोदवड रेल्वे मार्गासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण, भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात

Leave a Comment