होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Letest Weather News: जळगावचा पारा वाढला, आजचे तापमान किती ‘ते’ जाणून घ्या!

On: May 7, 2026 7:12 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडला मात्र वातावरणात उष्मा कायम आहे. जळगाव जिल्ह्यात ही बुधवारी काही ठिकाणी वादळी पाऊस झाला, पण त्यानंतर गुरुवारी वातावरणात उष्ण झळा जाणवत होत्या. सकाळी आठ- साडेआठ वाजेच्या सुमारास उन्हाचे चटके बसत होते. दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर उन्हाची तीव्रता वाढली होती. जळगावचे ४४ अंशावर असलेले तापमान काही अंशी घसरले असले तरी जिल्ह्याचे तापमान ४१ ते ४२ अंश सेल्सियस दरम्यान कायम आहे. जळगावचे आजचे तापमान ४१.२ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले आहे. तसेच बुधवारी तापमान ४०.४ आणि मंगळवारी ४०.९ इतके होते. आज तापमानात १ अंशाची वाढ झाली आहे.(Letest Weather News)

मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला आहे. तसेच कोकण- गोवा व मराठवाड्यात हवामान कोरडे होते. कमाल तापमान किंचित घसरले असले तरी हवेत उष्मा जाणवत आहे. कोकण- गोव्यात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वाशीम येथे ४२.६ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले आहे. तर सर्वात कमी कमाल तापमान ३२.२ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले आहे.(Letest Weather News)

 

गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सियसमध्ये)(Letest Weather News)

मुंबई (कुलाबा) ३३.८,
सांताक्रूझ ३३.९,
अचलबाग ३२.८,
रत्नागिरी ३४.६,
पणजी (गोवा) ३६.५,
डहाणू ३४.२,
पुणे ३९.२,
लोहगाव ४०.२,
अहिल्यानगर ३८.२,
जळगाव ४१.२,
कोल्हापूर ३७.४,
महाबळेश्वर ३२.२,
मालेगाव ४०.०,
नाशिक ३७.५,
सांगली ३९.३,
सातारा ३८.७,
सोलापूर ४१.०,
धाराशिव ४०.६,
छत्रपती संभाजीनगर ३९.५,
परभणी ४१.०,
नांदेड -,
बीड -,
अकोला ४२.१,
अमरावती ४१.२,
बुलढाणा ३८.५,
ब्रह्मपुरी ४१.२,
चंद्रपूर ४०.४,
गोंदिया ३७.९,
नागपूर ३९.६,
वाशिम ४२.६,
वर्धा ४१.१,
यवतमाळ ३९.२.

(Letest Weather News)

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment