होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

NEET PAPER LEAK CASE: नीट प्रकरणी सीबीआयचे देशभरात ‘इतक्या’ ठिकाणी छापे!

On: May 15, 2026 3:44 PM
Follow Us:
---Advertisement---

Mumbai News: देशभरात नीट पेपर फुटी प्रकरणाने संताप व्यक्त केला जात आहे, नीट-यूजी (NEET-UG) 2026 परीक्षा पेपरफुटी प्रकरणी तपास यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या असून केंद्रीय तपास संस्थेने (सीबीआय) गेल्या 24 तासांत आणखी दोन आरोपींना अटक केली असून, देशभरात छापे टाकून 14 ठिकाणी शोध मोहीम राबविली.

नीट-यूजी 2026 परीक्षेच्या आयोजनातील अनियमिततेबाबत शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या तक्रारीच्या आधारावर, सीबीआयने 12 मे 2026 रोजी गुन्हा दाखल केला होता. यापूर्वी, या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. यात जयपूर इथून तीन, गुरुग्राम मधून एक आणि नाशिकमध्ये अटक केलेल्या एका आरोपीचा समावेश आहे. या पाचही आरोपींना आज दिल्ली मधील न्यायालयात हजर करण्यात आले असून, पुढील चौकशीसाठी त्यांना सात दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आले.

12 मे 2026 रोजी सुरू केलेली आपली देशव्यापी मोहीम पुढे नेत, सीबीआयच्या विशेष पथकांनी गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात पुणे आणि अहिल्यानगर मध्ये प्रत्येकी एक, अशा आणखी दोन आरोपींना अटक केली.

अटक करण्यात आलेले आरोपी अहिल्यानगर येथून धनंजय लोखंडे अणे पुणे येथून मनीषा वाघमारे या दोघांचा समावेश आहे. आतापर्यंत ७ जणांना ताब्यात घेण्यातले आहे. या प्रकरणात १४ ठिकाणी सीबीआयने छापे घातले आहे, त्यातील इतर अनेक संशयित व्यक्तींची सध्या चौकशी सुरू असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणाशी संबंधित सर्व धागेदोरे तपासले जात असून, सर्वसमावेशक, निष्पक्ष आणि व्यावसायिक तपास करण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत, असे सीबीआयने म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment