होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

दिलासा! राज्याचा पारा घसरला, जळगावमध्ये पावसाच्या सरी, जिल्ह्याचे तापमान किती ‘ते’ जाणून घ्या!

On: June 1, 2026 7:32 PM
Follow Us:
---Advertisement---

Latest Weather News: जळगावमध्ये दिवसभर उकाडा जाणवत होता, जळगावचे तापमान उतरले असून आता ३९.५ अंश सेल्सियस इतके घसरले आहे, मध्य महाराष्ट्रात येलो अलर्ट दिला असून १ ते ५ जून दरम्यान वादळी वारा आणि मेगगर्जनेसह पावसाची शक्यता दर्शविली आहे. दिवसभर अधूनमधून ढगाळ हवामान असले तरी वातावरणातील उष्मा कायम असल्याने जळगावमध्ये उकाडा जाणवत आहे. सायंकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना काही काळ दिलासा मिळाला. पाऊस पडल्यावर मातीचा सुगंध सर्वत्र दरवळा आणि वातावरणात गारवा निर्माण झाला. तापमानाचा पारा घसरल्याने राज्याला ही दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्रात तुरळक ठिकाणे पाऊस पडला आहे.कोकण- गोव्यात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी आणि विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे तर मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. १ ते ७ जून कोकणात येलो अलर्ट जारी झाला आहे, तर मध्य महाराष्ट्रात १ ते ५ जून, मराठवाड्यात १ ते ३ जून आणि विदर्भात १ ते ४ जून येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

गेल्या २४ तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सियसमध्ये)

मुंबई (कुलाबा) ३५.८,
सांताक्रूझ ३४.८,
रत्नागिरी ३५.६,
डहाणू ३६.९,
पुणे ३७.१,
लोहगाव ३६.८,
अहिल्यानगर ३९.१,
जळगाव ३९.५,
कोल्हापूर ३५.४,
महाबळेश्वर २९.७,
मालेगाव ३९.२,
नाशिक ३६.३,
सांगली ३८.२,
सातारा ३७.७
सोलापूर ३९.१,
धाराशिव ४१.१,
छत्रपती संभाजीनगर ३९.२,
परभणी ४०.८,
बीड ४१.२,
अकोला ४०.३,
बुलढाणा ३८.४,
ब्रह्मपुरी ४२.८,
चंद्रपूर ४१.४,
गोंदिया ३९.६,
नागपूर ४०.२,
वाशीम ४३.८,
वर्धा ४२.०,
यवतमाळ ४०.६.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment