होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Amalner News: पारायणासोबत आचरण सुधारा; सेवेत भेदभाव नको : आबासाहेब मोरे

On: October 24, 2026 12:41 PM
Follow Us:
---Advertisement---

Amalner News: छत्रपती संभाजीनगर येथे २२ ते २६ जानेवारी २०२७ दरम्यान होणाऱ्या जागतिक कृषी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अमळनेर येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा केंद्रात आयोजित हितगुज मार्गदर्शन सभेत आबासाहेब मोरे यांनी सेवेकरी व भाविकांना मार्गदर्शन केले. यावेळी दिंडोरी प्रणित सेवा मार्गात कोणताही भेदभाव न करता एकजुटीने स्वामींचे कार्य करावे. केवळ पारायण करून चालणार नाही, तर आचरणातही सुधारणा झाली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

सभेत परमपूज्य गुरुमाऊलींचे परमश्रद्धेय शिष्य तथा सुपुत्र आबासाहेब मोरे यांनी आध्यात्मिक साधना, कौटुंबिक संस्कार, सामाजिक सेवा, पर्यावरण संवर्धन आणि शेतीविषयक उपक्रमांवर मार्गदर्शन केले. जागतिक कृषी महोत्सवात परमपूज्य गुरुमाऊली मार्गदर्शन करणार असल्याने सेवेकरी व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

स्वामींचा षडक्षरी मंत्र जपून आध्यात्मिक साधनेला सुरुवात करावी. आई-वडिलांना जिवंतपणी सुख द्यावे, विवाह योग्य वयात करून गुणांना महत्त्व द्यावे, तसेच सेवेकरी परिवाराने समाजात चांगली प्रतिमा निर्माण करावी, असे मोरे यांनी सांगितले.

तसेच डीजे, फटाके आणि प्लास्टिकचा वापर टाळून पर्यावरणपूरक उत्सव साजरे करावेत. निर्माल्यापासून खतनिर्मिती करावी, नद्यांचे संवर्धन करावे आणि दुष्काळ टाळण्यासाठी शेताच्या बांधावर वृक्षारोपण करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. अमळनेर केंद्रातर्फे सुरू असलेल्या ङ्गमातोश्री शकुंतलाबाई प्लेट बँकफ आणि शांकभरी सीड बँकतर्फे या उपक्रमांची माहिती देताना गावरान बियाण्यांचे जतन करण्याचे आवाहन त्यांनी केले. अमळनेर तालुक्यातील सुमारे ६० सेवा केंद्रांच्या माध्यमातून जनजागृती करावी, तसेच १ ते ७ जानेवारी २०२७ दरम्यान ग्राम अभियान सप्ताह राबवून नागरिकांना जोडावे, असे त्यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

Leave a Comment