JMC Election Results 2026 : जळगाव महानगरपालिकेवर महायुतीने आपला झेंडा फडकविला असून, 75 पैकी 69 जागांवर विजय मिळवल्या आहे. भाजपने 46, शिंदेसेनेने 22, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक जागा जिंकता आली. दुसरीकडे विरोधकांना केवळ 6 जागांवर समाधान मानावे लागले आहे. दरम्यान, महायुतीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्याने महापौर भाजपचाच असेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
विजयी उमेदवारांची नावे (वॉर्ड क्रमानुसार)
प्रभाग क्रमांक १ : ‘अ’ रिता विनोद सपकाळे (भाजप ), ‘ब’ दिलीप बबनराव पोकळे (शिवसेना),
‘क’ संगीता दांडेकर (शिवसेना), ‘ड’ भारती सागर सोनावणे (अपक्ष).
प्रभाग क्रमांक २ : ‘अ’ सागर शामकांत सोनवणे (शिवसेना), ‘ब’ उज्ज्वला किशोर बाविस्कर (शिवसेना), ‘क’ पूजा विजय जगताप (भाजप),’ड’ मधून विजय गजानन बांदल (भाजप).
प्रभाग क्रमांक ३ : ‘अ’ अर्चना संजय पाटील भाजप), ‘ब’ प्रतीक्षा कैलास सोनवणे (भाजप), ‘क’ प्रवीण रामदास कोल्हे (शिवसेना), ‘ड’ निलेश विशवनाथ तायडे (भाजप).
प्रभाग क्रमांक ४ : ‘अ’ शशीबाई शिवचरण ढंढोरे (भाजप), ‘ब’ विद्या मुकुंद सोनावणे (भाजप), ‘क’ कल्पेश कैलास सोनवणे (भाजप), ‘ड’ पियुष ललित कोल्हे (शिवसेना).
प्रभाग क्रमांक ५ : ‘अ’ विष्णू रामदास भंगाळे (शिवसेना), ‘ब’ मंगला संजय चौधरी ( शिवसेना),’क’ आशा रमेश पाटील (भाजप), ‘ड’ नितीन बालमुकुंद लड्डा (भाजप).
प्रभाग क्रमांक ६ : ‘अ’ अर्शिन बानो शोएब खाटीक (शिवसेना उबाठा), ‘ब’ शुचिता अतुल हाडा (भाजप), ‘क’ अमित पांडुरंग काळे (भाजप), ‘ड’ दीपक प्रभाकर सूर्यवंशी (भाजप).
प्रभाग क्रमांक ७ : ‘अ’ दीपमाला मनोज काळे (भाजपा), ‘ब’अंकिता पंकज पाटील (भाजप), ‘क’ विशाल सुरेश भोळे (भाजप), ‘ड’ चंद्रशेखर अत्तरदे (भाजप).
प्रभाग क्रमांक ८ : ‘अ’ सागर पाटील (भाजप), ‘ब’ मानसी निलेश भोईटे (भाजप), ‘क’ अमर जैन (भाजप), ‘ड’ नरेंद्र आत्माराम पाटील (शिवसेना).
प्रभाग क्रमांक ९ : अ मध्ये मनोज सुरेश चौधरी (शिवसेना), ब मधून प्रतिभा गजानन देशमुख (शिवसेना), क जयश्री राहुल पाटील (भाजप), ड मधून चंद्रशेखर शिवाजी पाटील (भाजप).
प्रभाग क्रमांक १० : ‘अ’ सुरेश माणिक सोनवणे (भाजप), ‘ब’ माधुरी अतुल बारी (भाजप), ‘क’ कविता किरण भोई (भाजप), ‘ड’ जाकीर खान रसूल खान (भाजप).
प्रभाग क्रमांक ११ : अ डॉ. अमृता चंद्रकांत सोनवणे (शिवसेना), ब मध्ये संतोष मोतीराम पाटील (शिवसेना), क सिंधुताई विजय कोल्हे (शिवसेना), ड ललित विजय कोल्हे (शिवसेना).
प्रभाग क्रमांक १२ : ‘अ’ अनिल अडकमोल (भाजप), ‘ब’ उज्ज्वला बेंडाळे (भाजप), ‘क’ गायत्री राणे (भाजप),
‘ड’ नितीन बरडे (भाजप).
प्रभाग क्रमांक १३: अ नितीन सपके (भाजप), ब मधून सुरेखा नितीन तायडे (भाजप), क मध्ये वैशाली अमित पाटील (भाजप), ड प्रफुल्ल गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी अजित पवार गट).
प्रभाग क्रमांक १४ : ‘अ’ सुनील सुपडू महाजन (भाजप), ‘ब’ जयश्री सुनील महाजन (भाजप), ‘क’ राबियाबी अमजद खान (भाजप), ‘ड’ रितिका संजय ढेकळे (भाजप ).
प्रभाग १५ : ‘अ’ अरविंद देशमुख (भाजप), ‘ब’ कलाबाई नारायण शिरसाळे (भाजप), ‘क’ रेशमा कुंदन काळे (शिवसेना),
‘ड’ प्रकाश बालाणी (भाजप).
प्रभाग क्रमांक १६ : ‘अ’ डॉ. वीरेन खडके (भाजप), ‘ब’ वंदना संतोष इंगळे (भाजप), ‘क’ रंजना विजय वानखेडे (भाजप),
‘ड’ सुनील वामनराव खडके (भाजप).
प्रभाग क्रमांक १७ : ‘अ’ जरीनाबी शब्बीर शहा (उबाठा), ‘ब’ हीनाबी शाकीर खान (उबाठा),’क’ इब्राहिम पटेल (उबाठा),
‘ड’ अक्षय वंजारी (उबाठा).
प्रभाग क्रमांक १८ : ‘अ’ डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे (शिवसेना), ‘ब’ नलूबाई तुळशीदास सोनवणे (शिवसेना), ‘क’ अनिता सुरेश भापसे (शिवसेना).
प्रभाग क्रमांक १९ : ‘अ’ रेखा चुडामण पाटील (शिवसेना), ‘ब’ गणेश (विक्रम) सोनवणे (शिवसेना), ‘क’ निकिता दुर्गेश वंजारी (शिवसेना), ‘ड’ राजेंद्र घुगे पाटील (भाजप).








