होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

जळगावात रविवारी ‘GA 500’ गुर्जर अधिवक्त्यांची राष्ट्रीय परिषद; देशभरातील गुर्जर अधिवक्ते होणार सहभागी

On: October 24, 2026 7:36 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: देशभरातील गुर्जर समाजातील अधिवक्त्यांना एका व्यासपीठावर आणत व्यावसायिक उत्कृष्टता, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रनिर्मितीचा संदेश देण्यासाठी ‘GA 500 Gurjar Advocates’ यांच्या वतीने ८ वी राष्ट्रीय लॉयर्स कॉन्फरन्स – २०२६ चे आयोजन रविवार, दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी जळगाव येथे करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, स्वराज्य आणि सुशासनाच्या भूमीत होणाऱ्या या राष्ट्रीय परिषदेस देशाच्या विविध राज्यांतून गुर्जर समाजातील अधिवक्ते उपस्थित राहणार आहेत.

या परिषदेचे आयोजन GA 500 Maharashtra Team यांच्या माध्यमातून करण्यात आले असून, जळगावातील हॉटेल कमल पॅराडाईज येथे सकाळी १० वाजता मुख्य कार्यक्रम होणार आहे.

परिषदेचे मुख्य अतिथी महाराष्ट्राचे जलसंपदा विभागाचे कॅबिनेट मंत्री ना. गिरीश महाजन आहेत. तसेच महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे कॅबिनेट मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, भारत सरकारच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाच्या राज्यमंत्री ना. रक्षा खडसे, राजस्थान उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती व्ही. एस. सिराधना, जळगावचे विधान परिषद सदस्य नंदकिशोर महाजन, महाराष्ट्राचे माजी राज्य माहिती आयुक्त व्ही. डी. पाटील आणि दिल्ली पोलिसांचे माजी डीसीपी जी. एस. आवाना यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

परिषदेत देशाच्या विविध भागांतील मान्यवर अधिवक्ते, न्याय क्षेत्रातील व्यक्ती तसेच गुर्जर समाजातील कायदे क्षेत्रातील प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. कार्यक्रमात ऍड. भारत भूषण गुर्जर, ऍड. शंताराम महाजन, ऍड. विनोद पाटील, ऍड. भगवान पाटील, ऍड. जी. एम. पाटील, ऍड. एस. यू. चौधरी, ऍड. यशवंत महाजन, ऍड. प्रशांत चौधरी, ऍड. ललितकुमार महाजन, ऍड. राजेंद्र गुर्जर, ऍड. योगेश महाजन यांच्यासह विविध मान्यवर अधिवक्त्यांची उपस्थिती राहणार आहे.

असा असेल कार्यक्रम

परिषदेच्या दिवशी सकाळी ८.३० वाजता नाश्ता, ९.३० वाजता नोंदणी, तर १० वाजता उद्घाटन समारंभ होणार आहे. त्यानंतर ११ वाजता शोधनिबंध व विषयांचे सादरीकरण, दुपारी १.१५ वाजता भोजन, २ वाजता विचारांची देवाणघेवाण आणि सायंकाळी ४.३० वाजता हाय-टी असा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.

जम्मू-कश्मीरच्या थंड वाद्यांपासून हिमाचल प्रदेश, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश तसेच देशाच्या विविध राज्यांतून येणाऱ्या गुर्जर समाजातील अधिवक्त्यांचे महाराष्ट्राच्या भूमीत स्वागत करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान, छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यपरंपरा आणि गुर्जर समाजाची सामाजिक व कायदे क्षेत्रातील वाटचाल यांचा संगम घडविणारी ही परिषद ठरणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

‘Unity – Profession – Justice’ तसेच ‘Service – Harmony – Nation Building’ या संकल्पनांवर आधारित या राष्ट्रीय परिषदेत कायदे क्षेत्रातील अनुभव, सामाजिक प्रश्न, व्यावसायिक विकास आणि समाजाच्या प्रगतीसंदर्भात विचारमंथन होणार आहे.

देशभरातील गुर्जर अधिवक्त्यांना परस्परांशी जोडणे, कायदे क्षेत्रातील व्यावसायिक सहकार्य वाढविणे आणि समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एकत्रितपणे काम करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या राष्ट्रीय परिषदेकडे जळगावसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment