GST Rule : जीएसटीची प्रक्रिया जास्त सुलभ व्हावी यासाठी सरकार महत्त्वाचे पाऊल उचलणार आहे. जीएसटी संदर्भात सरकार 1 नोव्हेंबर 2026 पासून मोठा निर्णय घेणार आहे. त्यानुसार, जीएसटीच्या काही नियमात सरकार बदल करणार आहे. 1 नोव्हेंबर 2026 रोजीपासून नवीन नियम लागू होण्याची शक्यता आहे. या नियमांमुळे जीएसटीशी संबंधित कामे सोपी होणार आहेत.
1 नोव्हेंबर 2026 पासून होणाऱ्या नवीन नियमानुसार, या निर्णयाचा फायदा छोटे व्यापारी, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर सामान विकणाऱ्यांना होऊ शकतो. या निर्णयामुळे साधारण 9.5 लाख छोट्या विक्रेत्यांना लाभ मिळणार मिळू शकणार आहे. नव्या नियमांनुसार सरकार जीएसटी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सोपी होऊ शकते. तसेच कर परतावा (टॅक्स रिफंड) लवकर मिळू शकतो. या नियमांचा फायदा अनेक राज्यांना होणार आहे. एखाद्या राज्यात छोट्या व्यापाऱ्यांचे ऑफिस नसेल तर अशा वेळी व्यापारी ई-कॉमर्सच्या वेअरहाऊसला व्यापाराचे मुख्य स्थान म्हणून सरकार दरबारी सांगू शकतात. परंतु अशा प्रकारची नोंद करण्याआधी संबंधित व्यापाऱ्याचे एखाद्या तरी राज्यात व्यापार सुरू असायला हवा. दुसऱ्या राज्यातील रजिस्ट्रेशन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या सहमतीने पूर्ण केले जाऊ शकेल.

नव्या निर्णयाअंतर्गत जीएसटी रजिस्ट्रेशनही सोपे होणार आहे. सरकार जीएसटी रजिस्ट्रेशनसाठी अनिवार्य कागदपत्रे तसेच इतर प्रक्रियेबाबत स्पष्ट निर्देशही देऊ शकते. जीएसटी पोर्टलवर अर्ज भरण्याची प्रक्रियाही सोपी होऊ शकते. या निर्णयामुळे अपरे कागदपत्रं तसेच चुकीच्या माहितीमुळे अर्ज फेटाळण्याचे प्रमाण कमी होईल.
दरम्यान, जीएसटी परिषदेने 8 ऑक्टोबर रोजी आपल्या 57 व्या बैठकीत या नियमांना मंजुरी दिली होती. आता या नियमांची अंमलबजावणी येत्या नोव्हेंबर महिन्यापासून टप्प्याटप्प्याने लागू होईल.










