DMC Election Results 2026 : धुळे महापालिकेत भारतीय जनता पक्षाने ६२ जागांपैकी तब्बल ५० जागांवर अभूतपूर्व विजय मिळवत महापालिकेची सत्ता काबीज केली आहे. अपवाद वगळता भाजपच्या बहुतांश उमेदवारांच्या गळ्यात धुळेकरांनी विजयाची माळ घातल्याने आमदार अनुपभय्या अग्रवाल यांच्या येथील मालेगाव रोडवरील जनसंपर्क कार्यालयात अभूतपूर्व जल्लोष करण्यात आला. यावेळी जय श्रीरामचा जयघोष आणि भगव्या गुलालची उधळण करत कार्यकर्त्यांनी आमदार कार्यालयात नृत्याचा ठेका धरल्याने वातावरण अक्षरशः भगवामय झाले होते.
विजयी उमेदवारांची नावे
अपक्ष – रऊफ खान हुरमत खान पठाण.
शिवसेना – छाया किरण अहिरराव, दीपक सुरेश खोपडे, धीरज जवाहरलाल कलंत्री, गीता सुरेश नवले, मंगला सुनील सोनवणे.
राष्ट्रवादी – शहनाजबी गुलाम खाटीक, अनम शेख तौहिद, इरफान अन्सारी, परविन बानो शेख रफिक, मतीन अहमद, फातेमा बी नूरुल अमिन, शाह शाहबाज फारुक शहा, नजमा शफी शाह.
एम आय एम – मंसूरी मुक्तार कासिम, हसीना बानो अन्सारी, शेख शहाजहान, मिर्झा शोयब नवाब बेग, अन्सारी अब्दुल हमीद, अन्सारी अमेरा बानो, अन्सारी हलीमा बानो, युसुफ मुल्ला, मदिना समशेर पिंजारी, अमीर असलम पठाण.
भाजपच थेठरला मोठा भाऊ
भाजप – कविता शरद सोनवणे, निशा सुशील कुमार महाजन, प्रभावती विलास शिंदे, सुनील वसंतराव सोनार, शोभा संजय भिल, मीनल आकाश परदेशी, युवराज लक्ष्मण चौधरी, देवेंद्र चंद्रकांत सोनार, नागसेन दामोदर बोरसे, प्रतिभा शिवाजीराव चौधरी, संध्या सागर कदम, कृपेश लक्ष्मण नांद्रे, भगवान शंकर गवळी, जोशना प्रफुल्ल पाटील, वैभवी अमित दुसाने, कमलेश नारायण देवरे, वंदना संजय भामरे, रंगनाथ रतन ठाकरे, रूपाली जगदीश पाटील, विजय अरुण देवरे, प्रियंका खंडू बोरसे, उज्वला अनिल ठाकरे, निलेश चंद्रकांत नेमाने, पुनम जितेंद्र शिरसाट, प्रदीप पुरण दास बैरागी, संजय सुधाकर जाधव, सुनील तुळशीराम बैसाणे, प्रतिभा अनिल पाटील, किरण राकेश कुलेवार, ललित वीरभान अरुजा, रोहित भानुदास चांदोडे, मायादेवी महादेव परदेशी, कल्पना सुनील महाले, चेतन संजय गवळी, प्रतीक प्रदीप करपे, जयश्री कमलाकर अहिरराव, विक्रम फकीरा थोरात, धीरज रामेश्वर परदेशी, कल्याणी सतीश अंपळकर, पुष्पा राजेश पवार, अमोल पावबा मासुळे, सुरेखा चंद्रकांत. उगले, चित्रलेखा विकी परदेशी, सारिका प्रवीण अग्रवाल.








