Jalgaon Mayor Reservation : जळगाव पालिकेसाठी महापौरपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव निघाले आहे. यामुळे ओबीसी महिला शहराच्या प्रथम नागरिक म्हणजेच महापौर होणार आहेत. मात्र, महापौरपदाची माळ कोणत्या लाडक्या बहिणीच्या गळ्यात पडणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
ओबीसी महिला राखीव प्रवर्गातून भाजपकडून दीपमाला काळे, उज्वला बेंडाळे, विद्या सोनवणे, माधुरी बारी, वैशाली पाटील, रंजना वानखेडे, वंदना इंगळे , गायत्री राणे यांच्या नावाची चर्चा आहे.
विशेषतः दीपमाला काळे, उज्वला बेंडाळे हे चौथ्यांदा निवडणूक आल्याने निष्ठावंत म्हणून त्यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, भाजप कुणाला संधी देतं? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, जळगाव पालिका निवडणुकीत भाजपने ४६, शिंदेसेनेने २२ तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने एक जागा आणि उद्धवसेनेच्या पाच जागा निवडून आल्या असून एका जागेवर अपक्षाने बाजी मारली आहे.
आता महापौरपद हे ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव निघाल्याने ओबीसी महिला शहराच्या प्रथम नागरिक म्हणजेच महापौर होणार आहेत. मात्र, महापौरपदाची माळ कोणत्या लाडक्या बहिणीच्या गळ्यात पडणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.








