होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

NCP Merger : देवेंद्र फडणवीसांना बोलण्याचा काय अधिकार; शरद पवार भडकले

On: February 4, 2026 12:01 PM
Follow Us:
---Advertisement---

NCP Merger : राज्याच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणावरून चर्चेला वेग आला आहे. या मुद्द्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या (दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत अजितदादांनी आम्हाला माहिती दिली नसती का? ) वक्तव्यावर शरद पवारांनी तीव्र संताप व्यक्त करत, या प्रकरणात बोलण्याचा त्यांना काय अधिकार आहे, असा सवाल उपस्थित केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांवरून शरद पवार यांनी आज बुधवारी (दि. ४  फेब्रुवारी) पत्रकार परिषद घेतली. यावेळी अजित दादाने १२ फेब्रुवारीला विलीनीकरणाची घोषणा होणार असल्याचे संकेत दिले होते. जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात या संदर्भात चर्चा सुरू होती, असे नमूद करत त्यांनी विलिनीकरणाच्या चर्चा प्रत्यक्षात झाल्याचे पुन्हा अधोरेखित केले.

देवेंद्र फडणवीस काय म्हणले होते?

मुख्यमंत्री फडणवीस यांनी, जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत चर्चा झाली असती तर मित्र पक्ष म्हणून अजितदादांनी आम्हाला नक्कीच माहिती दिली असती, असे वक्तव्य केले होते.

देवेंद्र फडणवीसांना बालण्याचा काय अधिकार – शरद पवार

मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या या वक्तव्यावर शरद पवारांनी तीव्र संताप व्यक्त करत, या प्रकरणात बोलण्याचा त्यांना काय अधिकार आहे, असा सवाल उपस्थित केला.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment