होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

चोपडा तालुक्यातील 79 ग्रा.पं.चे आरक्षण जाहीर; सरपंचपदासाठी इच्छुकांच्या हालचाली गतिमान

On: September 8, 2026 12:03 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: सन 2025-30 या पाच वर्षाच्या कालावधीसाठी चोपडा तालुक्यातील ग्रामपंचातींच्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडत दि. 7 सप्टेंबर रोजी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली नवीन प्रशासकीय इमारत चोपडा येथे जाहीर करण्यात आली. त्यात अनुसूचित जाती सरपंचपदासाठी 6 तर अनुसूचित जमाती 27, नागरिकांचा मागास प्र.वर्ग 6, सर्वसाधारण 40 असे एकूण 79 ग्रामपंचातीच्या सरपंचपदाचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले आहे.

सोडत अशी आहे

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षण 8 जुलै 2025 रोजी झालेल्या आरक्षणाप्रमाणे कायम ठेवण्यात आले आहे. अनुसूचित जाती प्रवर्गात मितावली, हातेड खु., मंगरूळ, चहाडी, वर्डी आणि लासूर या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गात चांदसणी, खाचणे, मामलदे, मजरे हिंगोणे, काजीपुरा, मजरेहोळ, मोहिदे, कुरवेल, गोरगावले खु., देवगाव, रुखनखेडा प्र.अ., पुनगाव, सुटकार, गलंगी, बिडगाव, भवाले, विरवाडे, वराड, वरगव्हाण, पिंप्री, तावसे खु., विटनेर, माचले, निमगव्हाण, लोणी आणि वटार यांसह 27 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

सर्वसाधारण प्रवर्गासाठी 40

नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी कुसुंबे, अनवर्दे बु., अकुलखेडे, भोकरी-खेडी बु., वेळोदे आणि अनवर्दे खु. या सहा ग्रामपंचायती आरक्षण निश्चित करण्यात आल्या आहेत.तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी 40 ग्रामपंचायतींचे आरक्षण निश्चित झाले आहे. यात भार्डू, हातोड बु, मौजे हिंगोणे, दगडी बु, विचखेडे-धुपे खु, दोंदवाडे, वेले-आखातवाडे, मालखेडे, धनवाडी, गोरगावले बु, गलवाडे, चुंचाळे, गणपूर, आडगाव, कमळगाव, धुपे बु, नागलवाडी, कठोरे, वढोदे, चौगाव, घोडगाव, वडती, गरताड, अजंतीसीम, बुधगाव, घाडवेल, तांदलवाडी, तावसे बु, सनफुले, वडगाव बु,अडावद, खर्डी, पंचक, धानोरा प्र.अ., पारगाव, अंबाळे, वाडकी, घुमावल बु, खडगाव, नरवाडे आदी 40 गावांचा समावेश आहे.

इच्छुकांची मोर्चे बांधणी

चोपडा तालुक्यातील 79 ग्रामपंचातीच्या आरक्षण सोडत जाहीर झाल्याने आता संबंधित गावांमध्ये सरपंचपदाच्या राजकीय समीकरणांना वेग येण्याची शक्यता असून इच्छुक उमेदवारांच्या हालचालींनाही सुरुवात होणार आहे. चोपडा तालुक्यातील 6 गावांमध्ये अनुसूचित जाती, 27 गावांमध्ये अनुसूचित जमाती आणि 6 गावांसाठी नामाप्र. तर 40 गावांमध्ये सर्वसाधारण सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुकांनी मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या बैठकांना वेग आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांचे फेक अकाउंट, नशिराबादमधून चेन्नई पोलिसांनी घेतले एकास ताब्यात

Ganesh Festival: गणेश विसर्जन मार्गाची प्रशासनाकडून पाहणी; मार्गातील अडथळे दूर करण्याचे निर्देश

जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी संघटनेतर्फे मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन; समान काम, समान वेतनासाठी मुंबईत जोरदार पाठपुरावा

कंडारी गावाजवळ मुख्य जलवाहिनीला गळती, शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत, आजचा पाणीपुरवठा उद्या 8 सप्टेंबरला होणार! एक दिवस उशिराने पुरवठा नियोजन

..अखेर आयआयटी बॉम्बेच्या तज्ज्ञांकडून नाशिकच्या रस्त्यांची पाहणी; कोअर कटद्वारे काँक्रिटची तपासणी

Latest Weather News: पुढील ‘हे’ तीन दिवस जळगावचे हवामान राहणार कोरडे; मध्य महाराष्टात कशी असेल स्थिती ‘ते’ जाणून घ्या!

Leave a Comment