होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

रागाच्या भरात मुलाने केली आईची हत्या; नेमकी घटना काय?

On: October 25, 2026 6:51 PM
Follow Us:
---Advertisement---

Jalgaon News: बोदवड तालुक्यातील येवती येथे जेवण बनवून न दिल्याच्या कारणावरून संतापलेल्या मुलाने जन्मदात्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. अलकाबाई पुरुषोत्तम वाघ (६३) असे मृत महिलेचे नाव असून, त्यांचा मुलगा गणेश वाघ याच्याविरुद्ध बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना २५ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपीला जेवण बनवून दिले नसल्याने आरोपीने रागातून टोकाचे पाऊल उचललं आणि घरातील लोणच्याची बरणी तसेच शेतीकामासाठीच्या लोखंडी अवजाराने आईवर हल्ला केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या प्राथामिक माहितीनुसार, जिल्ह्यातील बोदवड तालुक्यात येवती येथे मृत अलकाबाई वाघ या आपला मुलगा गणेश वाघ याच्यासोबत राहत होत्या. त्यांचे पती पुरुषोत्तम वाघ यांचे सुमारे १५ वर्षांपूर्वी निधन झाले होते. गणेशचे दोन लग्न झाले होते. मात्र, दोन्ही पत्नी त्याच्यासोबत राहत नसल्याचेही समजतं. अलकाबाई आणि गणेश हे दोघे एकाच घरात एकत्र राहत असल्याचे समोर आले. अलकाबाई यांचे नातू आकाश रविंद्र महाजन (वय २४) यांनी फिर्याद दिली. ते सध्या जामनेर तालुक्यातील पाटखेडा येथे राहत असून मजुरीचे काम करतात. २५ ऑक्टोबर रोजी पहाटे त्यांचा लहान भाऊ अनिकेत याने फोन करून आजीची हत्या झाल्याचे सांगितले. आकाश महाजन याने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

ते २५ ऑक्टोबर रोजी ते पहाटे आजी अलकाबाई यांच्या घरी पोहचले. घरासमोर गर्दी जमली होती. आकाश यानं घरात गेल्यावर बघितलं तर आजी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. त्यांच्या अंगावर गोधडी टाकलेली होती. जवळच गणेश वाघ हातात खुरपे घेऊन बसलेला आढळला असे फिर्यादीत म्हटले आहे. गणेशने रागाच्या भरात तिच्या डोक्यात लोणच्याची बरणी मारली आणि त्यानंतर घरातील खुरप्याने वार करून तिचा जीव घेतल्याचे गणेश वाघ याने सांगितल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे. या कथित कबुलीच्या आधारे आकाश महाजन यांनी बोदवड पोलीस ठाण्यात मामाविरुद्ध लेखी तक्रार दाखल केली. घटनास्थळी रक्ताचे डाग असलेली लोणच्याची फुटलेली बरणी आणि शेतीकामासाठी वापरले जाणारे लोखंडी अवजारही पडलेले असल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

आणखी वाचा

पशुधनासाठी चारा लागवडीला प्रोत्साहन अन् पाणीस्रोतांचे सर्वेक्षण- अधिग्रहणाची कार्यवाही करा: मंत्री छगन भुजबळ

कुंभमेळा ध्वजारोहण समारंभ: पास व्यवस्थापन, वाहतूक, पार्किंग अन् गर्दी नियंत्रणावर भर: शेखर सिंह

जळगावात रविवारी ‘GA 500’ गुर्जर अधिवक्त्यांची राष्ट्रीय परिषद; देशभरातील गुर्जर अधिवक्ते होणार सहभागी

JDCC Bank Election 2026: जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी ‘या’ दिवशी मतदान! वाचा, निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम

Amalner News: पारायणासोबत आचरण सुधारा; सेवेत भेदभाव नको : आबासाहेब मोरे

चोपडा बस आगाराच्या ताफ्यात नव्या कोऱ्या ११ बसेस दाखल; आ. प्रा चंद्रकांत सोनवणे अन् माजी आ. लताताई सोनवणे यांच्या हस्ते लोकार्पण

Leave a Comment