Samsung Mobile Update: एका अलीकडील अहवालानुसार, सॅमसंग आपल्या (W27) डब्लू-27 हा ‘बुक-स्टाईल’ फोल्ड करण्यायोग्य (foldable) स्मार्टफोन पुढील आठवड्यात चीनमध्ये लाँच करणार आहे. हा फोन केवळ चीनसाठीच उपलब्ध असेल. सॅमसंगच्या ‘हार्ट ऑफ द वर्ल्ड’ (Heart of the World) कार्यक्रमात हा स्मार्टफोन सादर केला जाण्याची शक्यता आहे.असे बोललं जात आहे. हा फोन कंपनीच्या अलीकडेच लाँच झालेल्या ‘Samsung Galaxy Z Fold 8 Ultra’ या फ्लॅगशिप फोल्ड फोनवर आधारित आहे, परंतु याचे डिझाइन अधिक प्रीमियम असून Samsung W27 चे एक कथित छायाचित्र ऑनलाइन लीक झाले आहे. ज्यात त्याचे डिझाइन आणि रंगाची माहिती समोर आली आहे. यात एक नवीन रंगसंगती आणि मागील पॅनेलवर एक विशेष चिन्ह बघायला मिळणार आहे.
या W27 फोनचे डिझाइन आणि रंग असा
‘X’ एक्स प्लॅटफॉर्मवर टिपस्टरने Ice Universe’ (@UniverseIce) आगामी Samsung W27 चे एक कथित छायाचित्र शेअर केले आहे. चीनसाठी खास असलेला हा फोल्डेबल फोन आहे. ‘Samsung Galaxy Z Fold 8 Ultra’ च्या तुलनेत अधिक प्रीमियम रंगात दिसत आहे. यात ‘रॉयल ब्लू’ रंगाचे फ्लॅट रिअर पॅनेल असू शकते, तर उभ्या, गोळीच्या आकाराच्या (pill-shaped) कॅमेरा मॉड्यूलला सोनेरी रंग देण्यात आला आहे.
गॅलक्सी झेड फोल्ड 8 अल्ट्राच्या धर्तीवर
पॅनेलच्या खालच्या भागात एक विशेष चिन्ह (insignia) देखील दिसत आहे, ज्याचा रंग कॅमेरा मॉड्यूलसारखाच सोनेरी आहे. याव्यतिरिक्त, Samsung W27 मध्ये ‘Galaxy Z Fold 8 Ultra’ सारखीच फ्लॅट मेटल फ्रेम आहे. मात्र, ही मिड-फ्रेम सोनेरी रंगाची असून, ती या ‘बुक-स्टाईल’ फोल्ड करण्यायोग्य फोनच्या प्रीमियम लूकला अधिक उठाव देते. ‘Galaxy Z Fold 8 Ultra’ प्रमाणेच, यातही पॉवर बटण आणि व्हॉल्यूम बटणे फोनच्या उजव्या बाजूला असण्याची शक्यता आहे.
W27 अधिक प्रीमियम फोन
अलीकडेच आलेल्या एका अहवालानुसार, दक्षिण कोरियाची ही टेक कंपनी २९ ऑक्टोबर रोजी ‘हार्ट ऑफ द वर्ल्ड’ (चिनी भाषेतून अनुवादित) नावाचा कार्यक्रम आयोजित करणार आहे. या कार्यक्रमात Samsung W27 लाँच केला जाण्याची अपेक्षा आहे. सॅमसंगची ‘W’ सीरिजचे फोल्डबल फोन आहे. त्यांच्या ‘Galaxy Z Fold’ सीरिजच्या तुलनेत अधिक प्रीमियम फोन म्हणून ओळखले जातात. मात्र, तांत्रिक वैशिष्ट्ये आणि फीचर्स बहुतांशी सारखीच राहण्याची शक्यता आहे. लीक झालेल्या प्रचारात्मक पोस्टरमध्ये लाल रंगाच्या आणखी एका छटेचेही संकेत मिळाले आहेत.

W27 ची वैशिष्टय अशी
मिळालेल्या माहितीनुसार, सॅमसंग W27 चीनमध्ये ५ नोव्हेंबर रोजी विक्रीसाठी उपलब्ध होईल आणि तो ‘सॅमसंग गॅलेक्सी फोल्ड ८ अल्ट्रा’पेक्षा अधिक महाग असेल. यात ‘स्नॅपड्रॅगन ८ एलीट जेन ५ फॉर गॅलेक्सी’ (Snapdragon 8 Elite Gen 5 for Galaxy) हे ऑक्टा-कोर चिपसेट असण्याची शक्यता आहे, ज्यासोबत १६ जीबीपर्यंत रॅम आणि १ टीबीपर्यंतची इनबिल्ट स्टोरेज दिली जाऊ शकते. तसेच, यात मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि कव्हर स्क्रीन तसेच फोल्ड होईल असे स्क्रीनवर प्रत्येकी १०-मेगापिक्सेलचे कॅमेरे असण्याची शक्यता आहे.









