Latest Wether Update: जळगावकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जळगावची आर्द्रता ६७ टक्के असली तरी जिल्ह्याचे तापमान घसरण्याचे संकेत मिळत आहे. आज आणि उद्या कमाल तापमान ३६ अंश सेल्सियसवर असेल मात्र, त्यांनतर कमाल तापामानात दोन ते तीन अंश सेल्सियस घसरण्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. तापमान ३६ अंश सेल्सियस वरून ३२ अंश सेल्सियसवर घसरण्याची शक्यता आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी असलेलं किमान तापमान १८ वरून आज १५.४ अंश सेल्सिअस इतकं घसरलं आहे. तर, रविवारी कमाल तापमान ३५.८ अंश सेल्सियस नोंदवलं गेलं होतं. तर आज कमाल तापमान ३६ अंश आहे. ते आणखी कमी होण्याचा अंदाज दिसून येत आहे. दरम्यान, जळगावचं आकाश मुख्यतः निरभ्र राहिल तसेच एक-दोन वेळा पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तरी, एकंदरीत कडक उन्हाच्या झळांपासून मात्र नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
२७ ऑक्टोबरला गडचिरोलीला येलो अलर्ट
उद्या २७ ऑक्टोबरला मराठवाडा जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी हलका व मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता आहे. कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात हवामान मुख्यतः निरभ्र राहण्याची दाट शक्यता आहे. मात्र, उद्या २७ ऑक्टोबरला गडचिरोलीला मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित ठिकाणी कोरडे आणि हलक्या सरींचा पाऊस पडेल असा अंदाज आहे.
२८ ऑक्टोबरला गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट
कोल्हापूर घाट, हिंगोली, नांदेड, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या घाटमाथ्यासह आठ जिल्ह्यात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी हलका आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी हवामान कोरडे राहिल. दक्षिण कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस- तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता आहे. उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये अंशतः ढगाळ हवामान राहण्याची दाट शक्यता आहे.

दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी ३० ते ४० किमी वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची दाट शक्यता आहे. ऑक्टोबरला विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (४०-५० किमी प्रति तास) वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे..










