होम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र देश राजकारण आरोग्य नोकरी सरकारी योजना बिझनेस राशीभविष्य क्रीडा

Breaking
---Advertisement---

Latest Weather News: ‘अर्नब’ चक्रीवादळाचा आंध्राला तडाखा, ३ जणांचा मृत्यू

On: October 28, 2026 3:55 PM
Follow Us:
---Advertisement---

Latest Weather News: अर्नब (Arnab) चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशला सर्वाधिक फटका बसला असून, यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे आणि ३१ घरांचे नुकसान झालं आहे, अशी माहिती राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं बुधवारी दिली. एनडीआरएफचे महानिरीक्षक (आयजी) नरेंद्र सिंह बुंदेला यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, केंद्र सरकार तसेच आंध्र प्रदेश आणि ओडिशा येथील आपत्ती व्यवस्थापन आणि बचाव पथकं आता दोन्ही राज्यांमध्ये आणि आसपासच्या परिसरात सुरू राहण्याची शक्यता लक्षात घेऊन पावसाचा सामना करण्यासाठी सज्ज आहे.

केंद्र सरकार, आंध्र प्रदेश आणि ओडिशाची आपत्ती प्रतिसाद आणि बचाव पथक आता पावसाच्या परिणामांना तोंड देण्यासाठी सज्ज होत आहेत. हा पाऊस दोन्ही राज्यांमध्ये आणि लगतच्या परिसरात सुरू राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती एनडीआरएफचे महानिरीक्षक (IG) नरेंद्र सिंह बुंदेला यांनी माध्यमांना दिली.

हे चक्रीवादळ पुदुचेरीतील यानमजवळ जमिनीवर धडकलं असून, अतिगंभीर चक्रीवादळावरून त्याची तीव्रता कमी होऊन ते तीव्र चक्रीवादळात रूपांतरित झालं आहे. हळूहळू त्याची शक्ती कमी होऊन त्याचे चक्रीवादळात आणि अखेरीस संध्याकाळपर्यंत खोल दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होईल, असा अंदाज आहे, असे ते म्हणाले. “अर्णब चक्रीवादळामुळे आंध्र प्रदेशचा उत्तर भाग आणि ओडिशाचा दक्षिण भाग सर्वाधिक प्रभावित झाला आहे. या दोन्ही राज्यांतील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वारं आणि पाऊस पडत आहे,” असे बुंदेला म्हणाले.

“आंध्र प्रदेशला सर्वाधिक फटका बसला आहे. आम्हाला कळवण्यात आले आहे की झाडे उन्मळून पडली आहेत, विविध प्रकारच्या ३१ घरांचे नुकसान झाले आहे आणि तीन जणांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक अहवालानुसार ओडिशामध्ये गंभीर परिणाम झालेला नाही,” असे ते म्हणाले.

३९ एनडीआरएफ पथके तैनात

आयजी म्हणाले की, चक्रीवादळामुळे प्रभावित होण्याची शक्यता असलेल्या शेजारील छत्तीसगड, झारखंड, पुदुचेरी, तेलंगणा आणि अंदमान आणि निकोबार बेटांसह आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये एकूण ३९ एनडीआरएफ पथके तैनात करण्यात आली आहेत.

बुंदेला म्हणाले की, काल रात्री आंध्र प्रदेशात एनडीआरएफची चार अतिरिक्त पथके पाठवण्यात आली. आंध्र प्रदेशातील सुमारे ५७,००० लोकांना मदत शिबिरांमध्ये हलवण्यात आले आणि काल रात्री यानममधून ३८ जणांना बाहेर काढण्यात आलं आहे, असं वृत्त पीटीआय वृत्त संस्थेनंही दिलं.

 

Join WhatsApp

Join Now

Join Facebook

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment